Home ताज्या बातम्या बँक’ व्यवहाराशी निगडीत आजपासुन’हे’ 7 नियम बदलणार, दैनंदिन जीवनावर होणार परिणाम

बँक’ व्यवहाराशी निगडीत आजपासुन’हे’ 7 नियम बदलणार, दैनंदिन जीवनावर होणार परिणाम

0

नवी दिल्ली,दि.1 सप्टेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आजपासुन बँकेशी संबंधित बरेच नियम बदलणार आहे. ज्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होईल. बँक अनेक कर्ज स्वस्त करणार आहेत तर बँकांच्या व्यवहारांच्या वेळेत बदल होणार आहे. हे बदल नक्की काय असणार आहेत, हे तुम्हाला माहिती हवेत. ज्याने तुम्हाला बँकेचे व्यवहार करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

  1. 59 मिनिटात मिळणार गृह कर्ज, वाहन कर्ज –
    सणासुदींचा विचार करता सरकार बँकांमधून फक्त 59 मिनिटात गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहेत. अनेक सरकारी बँका आजपासून (1 सप्टेंबर) ग्राहकांना नव्या सुविधा देणार आहे.
    ओरिएंटल बॅक ऑफ कॉमर्सने देखील psbloanin59minutes वर ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  2. SBI च्या ग्राहकांना RLLR वर गृह कर्ज मिळणार –
    1 सप्टेंबरपासून स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना गृह कर्ज स्वस्त करणार आहे, SBI च्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने गृह कर्ज प्रणालीची पद्धतच बदलली आहे. SBI ने गृह कर्जात 0.20 टक्के कपात केली आहे. आजपासून (1 सप्टेंबर) गृह कर्ज 8.05 टक्के असेल.
  3. 15 दिवसात मिळणार केसीसी –
    आजपासून (1 सप्टेंबर) शेतकऱ्यांना 15 दिवसात केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बँका आता शेतकऱ्यांना 15 दिवसात कार्ड उपलब्ध करुन देतील.
  4. बँक ऑफ महाराष्ट्रने लागू केली नवे व्याजदर –
    बँक ऑफ महाराष्ट्रने 25 तारखेला सांगितले की ते देखील आपले व्याजदर RBI च्या रेपो दराला जोडणार आहेत. ज्यामुळे याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल. जेव्हा जेव्हा RBI च्या रेपो दरात बदल होतील, तेव्हा तेव्हा बँकेच्या व्याजदरात बदल होईल. हे नवे व्याजदर आजपासून (1 सप्टेंबर) लागू होतील.
  5. 1 सप्टेंबरपासून मोबाइल वॉलेटसाठी KYC अनिवार्य –
    पेटीएम, गुगल पे, फोन पे सारख्या सर्व मोबाइल वॉलेटच्या वापरासाठी आजपासून (1 सप्टेंबर) केवायसी अनिवार्य असेल. केवायसीची करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असणार आहे. केवायसी न केल्यास मोबाइल वॉलेटचा वापर करता येणार नाही.
  6. SBI च्या फिक्स्ड डिपॉजिटच्या दरात कपात –
    SBI ने फिक्स्ड डिपॉजिटमध्ये कपात केली आहे. परंतू बचत खात्यावरील व्याजदरात बदल केलेले नाहीत. 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉजिट करणाऱ्यांना बचत खात्यावर 3.5 टक्के व्याज मिळेल, तर 1 लाख पेक्षा जास्त डिपॉजिट करणाऱ्यांना 3 टक्के व्याज मिळेल. बँकेने डिपॉजिट दरात 0.3 टक्के ते 0.7 टक्के कपात केली आहे.
  7. बदलू शकते बँकेचे व्यवहार सुरु होण्याची वेळ –
    सार्वजनिक बँकांची सुरु होण्याची वेळ शक्यतो सकाळी 10 असते आणि लोक 10 वाजेपर्यंत वाट पाहतात. परंतू आता बँकांच्या वेळा बदलू शकतात. यामुळे ग्राहकांच्या समस्या कमी होतील. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकांची सुरु होण्याची वेळ सकाळी 9 ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
Previous articleअॅड. प्रकाश आंबेडकर साहेबच मुख्यमंत्री होणार-शहानवाज शेख
Next articleद रोल मॉडल ऑफ गुड डीड्सपुरस्काराने आमदार राजकुमार बड़ोले सम्मानीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 2 =