Home ताज्या बातम्या द रोल मॉडल ऑफ गुड डीड्सपुरस्काराने आमदार राजकुमार बड़ोले सम्मानीत

द रोल मॉडल ऑफ गुड डीड्सपुरस्काराने आमदार राजकुमार बड़ोले सम्मानीत

78
0

थाईलैंडट येथील बुद्धिस्ट विद्यापीठाने केला गौरव
धम्मभुमी देहुरोड,दि.1सप्टेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-थाईलैंड येथील महचुला बुद्धिस्ट विद्यापीठाच्या एमसीयु ने राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री व विद्यमान आमदार राजकुमारजी बड़ोले यांचा द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे . बैंकाक येथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे ।
आपल्या मंत्रिपदाच्या कारकीरदीत राजकुमार बड़ोले यांनी दलित, शोषित, पीड़ित, मागस्वर्गीय आणि इतर समाजाच्या कल्याणासाठी भरीव कार्य केले आहे . भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सच्चा अनुयायी या नात्याने महाराष्ट्रात त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी वेळोवेळी योग्य भूमिका घेतली ।
आमदार राजकुमारजी बड़ोले यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती राज्यात वर्षभर साजरी केली . वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंती चा कार्यक्रम ‘भूतो न भविष्यतो’ अशा थाटात मुंबई च्या गेट वे ऑफ इंडिया वर दिमाखदार सोहळा द्वारे साजरा केला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मुकनायक पत्रिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन देशाच्या राजधानी दिल्ली येथे मुकनायक पुरस्कार घेण्याचे धाडस आमदार राजकुमार बड़ोले यांनी केले .
आमदार बड़ोले यांचा कारकीरदीत लंडन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरात विद्यार्थी दशेत वास्तव्य केले ते घर महाराष्ट्र सरकार ने विकत घेऊन त्याचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले यात राजकुमारजी बड़ोले यांचा सिंहाच्या वाटा होता हे विसरने शक्य नाही ।
पाली विद्यापीठ नागपुरात व्हावे या नागपुरातील विचारवंत आंबेडकरवाद्यांची भूमिका असल्याने बड़ोले यांनी वेळोवेळी राज्य सरकार सोबत बैठका घेतल्या हे विशेष .
पाली त्रिपिटकाचे मराठी भाषांतर करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन पुणे विद्यापीठाला रुपये 5 कोटी देण्याचे धाडस त्यांनी केले .
75 व्या महार बटालियनचा दिमाखदार सोहळा मुख्यमंत्रयांचा उपस्थितित मुंबई च्या गेट वे ऑफ इंडिया येथे घेऊन महार बटालियन च्या इतिहासाला ऊजाडा दिला .
आमदार राजकुमारजी बड़ोले यांचा या कार्याची दखल घेऊन थाईलैंड च्या प्रख्यात बुद्धिस्ट विद्यापीठाने द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे . हा पुरस्कार मिडाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleबँक’ व्यवहाराशी निगडीत आजपासुन’हे’ 7 नियम बदलणार, दैनंदिन जीवनावर होणार परिणाम
Next articleकाँगेसला झटका, काँग्रेसचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या भावाचा भाजपात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × two =