Home ताज्या बातम्या यशस्वी संस्थेच्या आयआयएमएस मध्ये पॉश कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

यशस्वी संस्थेच्या आयआयएमएस मध्ये पॉश कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

14
0

चिंचवड,दि.01 एप्रिल2024 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स म्हणजेच आयआयएमएस मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण म्हणजेच पॉश कायद्याविषयीची मार्गदर्शनपर कार्यशाळा शनिवारी (दिनांक ३० मार्च  २०२४ )आयोजित करण्यात आली होती.

एव्हीके लॉ असोसिएटच्या ॲडव्होकेट पल्लवी थत्ते यांनी या कार्यशाळेत पॉश कायद्याविषयी  सविस्तर मार्गदर्शन केले. नोकरदार  महिलांच्या संरक्षणासाठी  असलेल्या  या कायद्यातील  तरतुदी,लैंगिक छळ झाल्याबाबतची तक्रार  दाखल  करण्याबाबतची  प्रक्रिया तसेच आस्थापनांनी  लिंग  विविधता  आणि समावेशनाचे  धोरण  अवलंबण्याची गरज  यावरही  ॲडव्होकेट पल्लवी थत्ते यांनी मार्गदर्शन  केले. कार्यशाळेचे  प्रास्ताविक  करताना  आयआयएमएस चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती केल्यास भविष्यातील  नोकरी किंवा व्यावसायिक वाटचालीत  त्याचा  निश्चित लाभ  होतो  असे  सांगितले.संस्थेतील एमबीए  आणि एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह  प्राध्यापक  वर्ग  या कार्यशाळेत  सहभागी  झाले  होते.प्रेक्षा लुणावत व अभिषेक  मिश्रा  या विद्यार्थ्यांनी  पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर  जयकृष्णन  पी. या विद्यार्थ्याने  आभार  प्रदर्शन  केले.

Previous article‘मशाल’ चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
Next articleकर्करोगावर गुणकारी ‘मात्रा’ होमिओपॅथीची – डॉ. राजकुमार पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + 9 =