Home ताज्या बातम्या ‘मशाल’ चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

‘मशाल’ चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

84
0

कामशेत,दि.01 एप्रिल2024 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ नाणे मावळात गावोगावी संवाद बैठका सुरू आहेत. निष्ठावंत शिवसैनिकासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ‘मशाल’ चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी, सर्व सहकारी मंडळी यांनी उत्साहात प्रचार सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसारतील कोंडीवडे, उकसान, गोवित्री, वळवती, कांब्रे, तसेच तळेगाव दाभाडेजवळी माळवाडी या भागात गावात सदिच्छा भेट देत संजोग वाघेरे पाटील यांच्या सहका-यांनी गावक-यांशी संवाद साधला.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी अशा प्रकारे वाघेरे पाटील यांचा प्रचार सुरू आहे. विविध गावांमध्ये दिवसभर व रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या जात आहेत. संजोग वाघेरे पाटील यांचे परिचय पत्रक व त्यांच्या संदेशाचे पत्र ग्रामस्थ, महिला व युवा वर्गापर्यंत जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील हे नाव आणि मशाल चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहे. मावळ लोकसभेचे पुढचे खासदार संजोग वाघेरे पाटीलच असतील, असा विश्वास सर्वांकडून मिळत आहे.

Previous article‘वंचित’ने 8 उमेदवार केले जाहीर; नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय
Next articleयशस्वी संस्थेच्या आयआयएमएस मध्ये पॉश कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 3 =