Home अकोला ‘वंचित’ने 8 उमेदवार केले जाहीर; नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय

‘वंचित’ने 8 उमेदवार केले जाहीर; नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय

72
0

अकोला,दि.27 मार्च 2024 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे ते आता महाविकास आघाडीसोबत नसणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे मविआला धक्का बसला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. संजय राऊतांनी थोड्याच वेळापूर्वी आपण वंचितसाठी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले नाही, अजून वेळ आहे त्यांनी मविआसोबत यावे असे म्हटले होते.

मविआचा प्रतिसाद नसल्याने निर्णय

बहुजन महासंघाचा अविश्वसनीय अकोला पॅटर्न प्रकाश आंबडेकर यांनी यापूर्वी यशस्वी करुन दाखवला होता. त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी या पॅटर्नला कोणत्याही पक्षाल दुर्लक्षित करता आलेले नाही. गेल्या वर्षाच्या मध्यानंतर राज्यात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन प्रयोगाला बळ दिले.आम्ही जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

मी लोकांची नस ओळखतो

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असे आम्ही महाविकास आघाडीला सांगितले होते. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेदवार गरीब वर्गातील असणार

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.वंचित बहुजन आघाडी राज्य समितीने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ठाकरे यांना पाठिंबा देण्यात येणासर आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पक्ष) यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज्य समितीने घेतला आहे. 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल.

 

Previous articleमावळ लोकसभा उमेदवारी श्रमिकांचा नेता म्हणुन मला मिळावी – यशवंतभाऊ भोसले
Next article‘मशाल’ चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + eighteen =