पिंपरी,दि.२६ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- यशवंत (भाऊ) आनंदराव भोसले भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष यांनी पिंपरी येथील कलासागर हाॅटेल मध्ये पञकार परीषद घेऊन केले जाहीर मावळ लोकसभा लढवण्याची इच्छा असुन जागा भाजपलाच ठेवावी व श्रमिकांचा नेता म्हणुन मलाच उमेदवारी द्यावी.
चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशअध्यक्ष भारतीय जनता पार्टी,मा. मिस्टर. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी, मा. मिस्टर. चंद्रकांतदादा पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,मा. अमरजी साबळे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,मा. श्री शंकरराव जगताप, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर,म.श्री. अविनाशजी कोळी अध्यक्ष रायगड जिल्हा, भारतीय जनता पार्टी,मा. शरद बुट्टे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांना पञ देऊन मागणी केली.
यशवंत (भाऊ) आनंदराव भोसले भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून गेली २९ वर्ष कामगार संघटनेमध्ये काम करत आहेत. गेली ९ वर्ष भारतीय जनता पार्टीचा सदस्य व कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर तसेच संसदेतील श्रम मंत्रालयात कामगार कायदे पुर्नग्ठन समिती तसेच श्रमिकांच्या धोरणाबाबतच्या इतर समितीवर नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड यूनियन या भारतीय जनता पार्टीच्या संलग्न असलेल्या कामगार संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून देखील भोसवे समितीवर सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील शासनाच्या विविध विभागांमध्ये राज्यातील विविध उद्योग तसेच रुग्णालय, मंदिर संस्थान यामध्ये काम करणाऱ्या राज्यातील संघटीत व असंघटित श्रमिकांच्या हिता करिता संघटनेच्या माध्यमातून गेली २९ वर्ष यशवंत भोसले अविरत काम करत आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघामध्ये पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, कर्जत, उरण, मावळ (तळेगाव) इत्यादी शहरामध्ये औद्योगिकीकरण विस्तारले असून लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग आपल्या परिवारासह या ठिकाणी स्थिरावलेला आहे.श्रमिकांचा प्रतिनिधि म्हणून देशात उत्तम संदेश जावा या करिता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कामाचा अनुभव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीची मावळ लोकसभा मतदार संघाची उमेदवारी आम्हाला देण्यात यावी अशी मागणी करुन. उमेदवारी दिल्यास आम्ही शंभर टक्के विजयी होऊ असा आत्मविश्वास देत आहोत.