Home ताज्या बातम्या शिवसेनेचे प्रसिद्धीलोलुप खासदार श्रीरंग बारणे यांनी स्टंटबाजी व दुट्टपी भुमिका थांबवावी-पक्षनेते...

शिवसेनेचे प्रसिद्धीलोलुप खासदार श्रीरंग बारणे यांनी स्टंटबाजी व दुट्टपी भुमिका थांबवावी-पक्षनेते नामदेव ढाके

82
0

पिंपरी,30 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असल्याने दरवर्षीप्रमाणे महापौरांच्या हस्ते जलपुजनाचा कार्यक्रम होत असतो. ही आजपर्यंतची प्रथा आहे. परंतु, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी करत जलपुजनाचा कार्यक्रम आज केला. महापौरांचा कार्यक्रम ठरलेला असताना खासदारांनी त्यांना डावलून जलपूजन करणे म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महिला महापौरांचा अवमान केल्यासारखा आहे, असा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

खरंतर सन २०१७ ला भाजपा सत्तेत आल्यानंतर भामा आसखेड ३०० एमएलडी पाणी उचलण्याची मंजूरी घेवून त्यापैकी आंध्रा योजनेमधून १०० एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल तयार करणे, जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकणे, जलशुध्दीकरण केंद्र अदयावत करणे व त्यापुढे पाण्याच्या टाक्या बांधून पाईप लाईन टाकण्याचे काम समांतर पध्दतीने सुरु करून नागरिकांपर्यंत जलद गतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे, याचा खासदारांना विसर पडल्याचा दिसतो. या संपूर्ण योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. लवकरच हे काम पूर्ण होवून शहराची पाणी समस्या सुटणार आहे. शहरातील नागरिकांना समान पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाने दिवसाआड पाणी पुरवठा केला आहे. असे असताना खासदार श्रीरंग बारणे हे पिंपरी चिंचवड शहरात एक भुमिका घेतात व मावळात गेल्यानंतर दुसरी भुमिका घेवून दुटप्पीपणा करतात. हे खासदार बारणे यांच्यासारख्या ज्येष्ठ प्रतिनिधीला शोभत नाही.

पिंपरी चिंचवड शहराचे प्रथम नागरिक म्हणून जलपुजन करणे हा महापौरांचा अधिकार असताना आमचा जलपुजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर घाई गडबडीत दरवेळी आमच्या अगोदर पवना धरणावर जावून जलपूजन उरकूर घेतात. प्रसिध्दी लोलूप खासदार श्रीरंग बारणे यांचा हा स्टंट पिंपरी चिंचवडकरांच्या व मावळच्या जनतेच्या लक्षात आला आहे. ‍पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकरण अत्यंत वेगाने वाढत असून दिवसेंदिवस पाणी साठा शहरासाठी कमी पडत चाललेला आहे. यासाठी खासदार म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून शहरासाठी काय मदत मिळावली याचे स्पष्टीकरण शहरवासीयांना द्यावे, असेही पक्षनेते ढाके यांनी नमूद केले आहे.

Previous articleN.F.I.T.U. च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची निवड
Next articleपि.चि.मनपात रिपाई(आठवले) पक्षाचे नगरसेवक अगामी निवडणुकीत युवक आघाडीचे असतील,तयारी सुरु झाली-युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × one =