Home ताज्या बातम्या N.F.I.T.U. च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची निवड

N.F.I.T.U. च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची निवड

168
0

पिंपरी,दि 28 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- N.F.I.T.U. च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची निवड करण्यात आली असुन एन.एफ.आय.टी.यु प्रतिनिधी म्हणून केंद्रीय श्रम मंत्रालय , दिल्ली येथील विविध समित्यावर नियुक्ती

महाराष्ट्र राज्याचे कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांची नॅशनल फेडरेशन ऑफ इंडीयन ट्रेड युनियन या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . एनएफआयटीयु चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . दिपक जयस्वाल यांनी या निवडीबाबतची घोषणा नवी दिल्ली येथे केली .

एनएफआयटीयु ही केंद्र शासनमान्य संघटना आहे.या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे देशातील असंघटीत , संघटीत अशा पन्नास कोटीच्यावर असलेल्या कामगारांच्या प्रश्नाकरीता संसदेच्या श्रम मंत्रालय निगडीत कामगार कायदे पुनर्गठन समीती , देशभरात असलेल्या अडतीस कोटी असंघटीत कामगारांसाठी काम करणारी वेतन समिती , देशभरातील संघटीत,असंघटीत कामगारांसाठी आर्थिक तरतुद करणारी व कामगार हितासाठी विविध उपक्रम राबविणारी संसदीय स्थायी समिती ( कामगार ) , कामगारांसाठी देशभरात विविध कल्याणकारी काम करणारे विविध बोर्ड या सर्व ठिकाणी एनएफआयटीयु या संघटनेच्या वतीने प्रतिनीधी या नात्याने काम पाहण्याची संधी आता यशवंतभाऊ भोसले यांना मिळणार आहे, त्याचबरोबर अंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या कामगार संघटनेतही भारतीय श्रमिकांच्या भुमीका मांडण्याची संधी यशवंतभाऊ यांना प्राप्त होणार असुन . केंद्र शासनाने देशीरातील केवळ 14 कामगार संघटनांना मान्यता दिली असून एनएफ.आयटीयुही त्या पैकी एक महत्वपूर्ण संघटना आहे . संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी यशवंतभाऊ भोसले यांची निवड झाल्यावर संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . दिपक जयस्वाल यानी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , केंद्रीय श्रम मंत्री भुपेदीह यादव , राज्यातील सर्व मुख्यमंत्री , महाराष्ट्राचे कामगार मंत्री तसेच अंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे डायरेक्टर यांना पत्र पाठवून कळविले असून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.अशी माहिती वरीष्ठ उपाध्यक्ष यशवंत भोसले यांनी पञकार परिषदेत दिली.

Previous articleराष्ट्रवादीच्या आंदोलनावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची प्रतिक्रीया…
Next articleशिवसेनेचे प्रसिद्धीलोलुप खासदार श्रीरंग बारणे यांनी स्टंटबाजी व दुट्टपी भुमिका थांबवावी-पक्षनेते नामदेव ढाके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =