Home ताज्या बातम्या मंञी नारायण राणेंना पोलिसांकडुन अटक तर पिंपरी चिंचवड मध्येही गुन्हा दाखल करण्याची...

मंञी नारायण राणेंना पोलिसांकडुन अटक तर पिंपरी चिंचवड मध्येही गुन्हा दाखल करण्याची युवा सेनेची मागणी

117
0

पिंपरी,दि.24 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची पिंपरी चिंचवड मध्ये युवा सेनेची मागणी,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती असे वक्तव्य करत टीका केली आहे. त्यामुळे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. युवा सेनेने केंद्रीय मंत्री राणे यांचा निषेध व्यक्त करत गुन्हा करण्याची मागणी केली आहे. राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच अशांतता व गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे.तर राणेंना महाड पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पुढील कारवाही महाड पोलिस करत आहेत.
युवा सेनेचे शहर अधिकारी विश्वजित बारणे, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, शहर समन्वयक रूपेश कदम, विधानसभा अधिकारी निलेश हाके, माऊली जगताप, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असुन पिंपरी चिंचवड मध्येही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तसेच संपुर्ण महाराष्र्टात वातावरण तणावपुर्ण झाले आहे.

Previous articleनाशिक मध्ये गुन्हा दाखल झाल्याने मंञी नारायण राणेंना पोलिसांकडुन अटक तर त्यांच्या जीवाला धोका असल्याचे प्रसाद लाड यांच वक्तव्य
Next articleदिघीमध्ये मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सचे उदघाटन;विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 − one =