Home ताज्या बातम्या दिघीमध्ये मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सचे उदघाटन;विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार

दिघीमध्ये मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सचे उदघाटन;विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार

89
0

दिघी,दि.24 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहपौर सौ.नानी ऊर्फ हिराबाई घुले यांच्या शुभहस्ते फीत कापून मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेसचे उदघाटन नगरसेवक विकास डोळस , नगरसेवक दिनेश यादव , शिवराज लांडगे , तात्या सपकाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले . या प्रसंगी उपमहापौर सौ नानी ऊर्फ हिराबाई घुले यांच्या हस्ते धन्वंतरी मुर्तीला तर गणपतीच्या प्रतिमेस तात्या सपकाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.जयश्री पाडेकर यानी प्रार्थना म्हटली . उपमहापौर सौ नानी घुले यांनी मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ काशिनाथ बामणे यांचे मुक्तकंठाने कौतुक केले . नगरसेवक विकास डोळस आपल्या मनोगतात म्हणाले ,“ कोविड सारख्या महामारीच्या साथीमध्ये भविष्यकाळात निसर्गोपचार आणि योगोपचार यांचे योगदान अपूर्व राहणार आहे.मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्ससेमुळे दिघीच्या नावलौकीकात भर पडणार आहे . दिघीतील विद्यार्थ्यासाठी या कॉलेजमधून डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी निर्माण होत आहे .

सौ वीणा सोनवलकर या प्रसंगी वोलताना म्हणाल्या , ” डॉ काशिनाथ बामणे हे मासुळकर कॉलनी परिसरातील एक सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ आणि योगोपचारक आहेत . त्यांनी आपल्या रूग्णसेवेतून समाजाचे प्रेम संपादन केले आहे. डॉ शिवकुमार दुवे आपल्या मनोगतात म्हणाले , “ अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधण्यातच मानवाचे हित आहे .ईश्वरभक्तीने माणसाला मनःशांती मिळते , तर निसर्गोपचारामुळे माणसाचे आरोग्य उत्तम राहते . जयश्री पाडेकर यांनी डी.एम .एल .टी .या अभ्यासक्रमाची सखोल माहिती दिली . विमल फौंडेशनचे अध्यक्ष विल्यम साळवी आपल्या भाषणात म्हणाले , ” पुणे हे विद्येचे माहेर घर आहे . मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेसच्या माध्यमातून शहराच्या नवलौकीकात भर पडणार आहे . या परिसरातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्यास या कॉलेजमुळे शक्य होणार आहे . निसर्गोपचार आणि योगविद्येचे कोरोनोत्तर काळात महत्व अधोरेखीत झाले आहे .”

मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सचे प्राचार्य वी .आर . माडगूळकर म्हणाले , ” महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की , ‘ मी स्वातंत्र्य चळवळीत पडलो नसतो , तर आयुष्यभर निसर्गोपचार आणि योगोपचाराचा प्रचार आणि प्रसार केला असता . ‘ निसर्गोपचाराने रोग समूळ नष्ट होतो . बाष्पस्नान , मालिश , कटीस्नान , माती लेप , एनिमा , योगासने या निसर्गोपचाराच्या उपचार पद्धती आहेत . आगामी काळात निसर्गोपचाराचे महत्व अधीकच वाढत जाणार आहे .

कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेसचे संस्थापक अध्यक्ष मा . काशिनाथ बामणे आपले विचार मांडताना म्हणाले ,“ मातोश्री कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स हे यु.जी . सी . मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वैद्यकिय विभागातील कोर्सेस चालविणार आहे . आयुष विभागातील योगा आणि नॅचरोपॅथी ही एक जागतिक दर्जाची पॅथी आहे . योगा आणि नॅचरोपॅथी कोर्स साठी विज्ञान शाखेमधून उतीर्ण झालेले विद्यार्थी ( नीट ) परीक्षेशिवाय पदवी परीक्षेला प्रवेश घेऊ शकतील . त्याच बरोवर परामेडिकल विभागातील कोर्सेसना प्रवेश घेऊ शकतील .डॉ बामणे यांनी कॉलेजची ध्येय व उद्दिष्टये याची माहिती दिली .या कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी त्यांच्या व्यवसायात पहिल्या दिवसापासून साधनसंपन्न होऊन संस्थेसाठी , समाजासाठी आणि राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान करतील . ” ” कार्यक्रमाचे अध्यक्ष मा तात्या सपकाळ आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले , “ निसर्गोपचार ही आद्य उपचार पद्धती आहे . निसर्गोपचाराने रोगाचे समूळ उचाटन होते . ‘ या कार्यक्रमात आर .वी . पाटील , प्राध्यापक चंद्रकांत ओव्हाळ , नामदेवराव सोनवलकर आणि प्रणिता राठी यानी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमास प्रकाश चौधरी , अवनी शहा , उल्हास झिरपे , प्रसाद थोरगुले , स्नेहलता चकवर्ती , अमित बन्सल , हिना मुलाणी , महेश रोकडे , विशाल बालघरे , धुराजी शिंदे , डॉ मनोज पाटील , राजेश बोदडे उपस्थित होते . डॉ वी . आर . माडगूळकर आणि श्री विल्यम साळवी यांनी सूत्रसंचालन केले . डॉ अमर साळवे यांनी आभार मानले .

Previous articleमंञी नारायण राणेंना पोलिसांकडुन अटक तर पिंपरी चिंचवड मध्येही गुन्हा दाखल करण्याची युवा सेनेची मागणी
Next articleकेंद्रीय मंञीनारायण राणेंना जामीन मंजूर; भाजप कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − fifteen =