Home ताज्या बातम्या आमदार लक्ष्मण जगताप व महेशदादा लांडगे यांच्या समोर पिंपरी चिंचवड शहरात महाविकास...

आमदार लक्ष्मण जगताप व महेशदादा लांडगे यांच्या समोर पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडी फिकी आणि कमजोर…

83
0

पिंपरी,दि.11 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या नेते जोमात माञ कार्यकर्ते कोमात अजित पवार राज्याचे उपमुख्यमंञी असुन ते पुणे जिल्हाचे पालकमंञी असुन ते पिंपरी चिंचवड शहरावर नाराज आहेत.म्हणुच ते शहरातील राष्र्टवादी च्या कार्यकर्त्याना तंबी देत नाहीत,त्यामुळे कार्यकर्ते मनमानी कारभार करत आहेत. आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना पेचात पकडण्यासाठी महाविकास आघाडीत अजुन तरी पावरफुल नेता नाही त्या मुळे शहरात भाजपा पुढे तरी महाविकास आघाडी फिकी आहे.

पिंपरी चिंचवड शहरात भाजपा समोर महाविकास आघाडी फिकी आणि कमजोर असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या भूमिकेनं पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांची अवस्था सहनही होईना आणि सांगताही येईना अशी झाली आहे का ? भाजपाची शहरात एक हाती सत्ता आहे.माञ राज्यात महाविकास आघाडी झाल्याने शहरातही महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते एकञ येत शहरात विरोधी पक्षाची भुमिका ठोस बजावयला पाहिजे होती माञ तसे चिञ महापालिकेत दिसत नाहीत,दत्ता काका साने यांच्या नंतर खमक्या विरोधीपक्ष नेता राष्र्टवादीकडे नाही,आता जो विरोधी पक्ष नेता आहे,तो सत्ताधारी भाजपाला मॅनेज असल्यासारखे आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते राजु मिसाळ विरोधी पक्षाची ठोस भुमिका बजावत नाहीत.त्या ऐवजी मंगलाताई कदम यांनी विरोधीपक्ष नेते पद दिले असते तर त्यांनी सत्ताधारी भाजपाला सळो की पळो करुन सोडले असते.तसेच शिवसेनेचेही आहे,गटनेता म्हणुन राहुल कलाटे हे ऐकमेव चेहरा आहे.म्हणुन त्यांच्या राजी नाम्यानंतर अजुन चार महिने उलटुनही गटनेता सापडला नाही,राष्र्टवादी,शिवसेने कडे शहरध्यक्ष व युवक अध्यक्ष खंबीर आणि कॅपेबल नाही तर दुसरी कडे काॅंग्रेस पक्षाला तर शहरातच खंबीर नेतृत्व नाही.कैलास कदम यांच्या नंतर काॅग्रेस कडे नेतृत्व सापडले नाही.माञ यांत शिवसेना राष्र्टवादी मध्ये कधी संधी न मिळालेले नेत्यांना काॅंग्रेसमध्ये संधी च सोन करण्याची संधी मिळु शकते,प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेनी काॅग्रेंस पक्ष वाढी साठी काम सूरु केले अनेक नेते पक्षातंर करत आहेत माञ नाना पटोलेंनी पिंपरी चिंचवड शहराकडे पाठ फिरवली म्हणुनच शहरात अजुन ते दुर्लक्षीत आहेत.
जर शहारात त्यांनी लक्ष दिले तर काॅंग्रेस ला नवीन नेतृत्व मिळेल,व भाजपातुन किंवा राष्र्टवादी, शिवसेनेतुन नेतृत्व करण्यासाठी काही नेते नाना पटोलेनाही भेटत आहेत.कार्यकर्त्यांची परिस्थीती ही राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला होता. त्यापेक्षा अधिक गोंधळ आता निर्माण झाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यामुळे इतके वर्ष सोबत असलेले भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे झाले आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोणता पक्ष कोणासोबत युती, आघाडी करेल. हे सांगता येत नाही. त्यामुळं शहरातील कार्यकर्ते पेचात पडले आहेत.दररोज आपल्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन सोशल मीडियावर हमरीतुमरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता चांगलीच गोची झाली आहे.शहरात महाविकास आघाडी च्या तिन्हि प्रमुख घटक पक्षानी एकञ येत ना कोणते आंदोलन केले ना कोणता भाजपाला विरोध केला.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला कॉंग्रेस स्वबळाची भाषा करत आहे. तर इकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी स्वाभीमानाशी तडजोड करत दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाही, भले ही फाटक्या चपला पायात असल्या तरी चालतील. असं म्हणत अधिकच संभ्रम वाढवला.तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावं असं पत्र उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. पत्रामुळे भाजप शिवसेना एकत्र येतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.व त्या मुळे शहरात कार्यकर्त्यान मध्ये आजुन संभ्रम निर्माण झाला आहे.
तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांची पहिल्यापासून जवळीक असली तरी राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाऊ शकते. असा अजित पवार यांचा अनुभव सोबत असताना शहरात थोडे का होईना माञ कॉग्रेस कार्यकर्ते गोंधळात आहेत.
अजित पवार राज्याचे उपमुख्यमंञी असुन ते पुणे जिल्हाचे पालकमंञी आहेत.पण पिंपरी चिंचवड शहरावर नाराज आहेत.आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना पेचात पकडण्यासाठी महाविकास आघाडीत अजुन तरी पावरफुल नेता नाही त्या मुळे शहरात भाजपा पुढे तरी महाविकास आघाडी फिकी आहे.आमदार अण्णा बनसोडे हे त्यांचा व्यापातच असतात त्यामुळे त्यांच्या कडे महविकास आघाडीचे नेतृत्व घेण्याची क्षमता नाही.त्यात मा.आमदार गौतम चाबुकस्वार यांची आणि आण्णा बनसोडे हे एकञ दिसतील माञ एकञ काम करु शकत नाही,मा.आमदार विलास लांडे यांच नेतृत्व तर आदीच राष्र्टवादीच्या नेत्यांनी अमान्य केले आहे,म्हणुन लांडे आता आक्रमक भुमिका घेत नाहीत,त्यामुळे कार्यकर्ते माञ कोमात असुन स्वबळाची तयारी तिन्ही पक्ष करत आसुन आयत कोलीत भाजपाला देऊन पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात भाजपाची सत्ता येणार हे चिञ तरी सद्या दिसत आहेत.जर भाजपाला शहरातुन हारवयाचे असेल तर आता पासुनच महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी एकञ येत,मोर्चे अंदोलने करणे,निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मेळावे घेणे व शहारातील दिशाहिन नेतृत्वाला नेतृत्व मिळवुन देण्याची गरज आहे.नाहीतर शहरातील प्रमुख नेत्यांना एकञ येत शहरात तळेगाव नगरपरिषदे सारखे पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी बनवुन निवडणुक लढण्याची तयारी करावी लागेल.भाजपाला सत्तेतुन दुर ठेवणे म्हणजे महाविकास आघाडीला एक चॅलेंज आहे.महाविकास आघाडी एकञ येत हे चॅलेंज स्वीकारतील का?

जिल्हा स्तरावर तर मोठाच विषय झाला आहे. आगामी महापालिका निवडणूकांच्या तोंडावर जिल्हा लेव्हलच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नक्की कोण जवळचा आणि कोण लांबचा? हेच समजत नसल्यानं नियोजन करता येत नाही. कोरोनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अगामी निवडणूका तोंडावर आहेत.महानगरपालिकांच्या निवडणूका येत्या फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्यामुळे या महानगरातील कार्यकर्ते नियोजनाला लागले आहे. मात्र, नियोजनात कोण आपला आणि कोण परका याचं गणित बांधणं या कार्यकर्त्यांना कठीण जात आहे.

त्यामुळं या निवडणुकांमध्ये कोणाला आपला सखा म्हणावा, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. खा.संजय राऊत शहरा आले आणि 50 नगसेवक आणणार त्यांची बांधणी करणार असे म्हटले माञ प्रत्येक पक्षात गटबाजी असल्याने भाजपा हि शहरात महाविकास आघाडी ला सरस ठरेल?जर भाजपाला शहरात सत्ते पासुन दुर ठेवायचे असेल तर महाविकास आघाडीने एकञ राहुन आता पासुन भाजपा विरोध केला पाहिजे.ठेकेदारी विसरुन आता तरी महाविकास आघाडीने जागे झाले पाहिजे.भाजपा चे पक्षनेते नामदेव ढाके,महापौर माई ढोरे,स्थायी समीती अध्यक्ष नितीन लांडगे,या समवेत अनेक वेळा राष्र्टवाद आणि शिवसेनेचे नेते पदाधिकारी एकञ असतात त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणांतर पक्षातंर घडण्याची शक्यता ना कारता येत नाही.महाविकास आघाडी शहरातुन भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवण्यास यशस्वी होईल का की फिकी पडेल.काही नगरसेवक तर मनमानी कारभार करत आहेत.माञ त्यांना अजुन भाजपा चा अंदाज नाही,त्यांचा पक्षांतराने भाजपा,शिवसेना,राष्र्टवादी,काॅग्रेंस यांना काही फरक पडत नाही,भाजपाची रणनिती तयार आहे,विरोधक विरोधीभुमिका बजवण्यास अपयशी आहेत,व ते छुपा पाठींबा भाजपाला देतात त्यामुळे भाजपा बिनधास्त आहे.महाविकास आघाडी जलवा दाखवण्यास असर्थ आहे.त्यामुळे भाजपाची एक हाती सत्ता येऊ शकते.वरीष्ठ सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जणु भाजपाला शहरात छुपा पाठींबा,छुपी युती आहे,म्हणुन शहराकडे पाठ फिरवली आहे.माञ भाजपानेही कोणत्याही संभ्रमाताराहु नये भाजपाचे नगरसेवक घरचा आहेर देत भाजपाला रामराम ठोकतील,आणि भाजपाला पाय उत्तार करण्यास निवडणुक लढवतील.बरेच नगरसेवक राष्र्टवादीत प्रवेशे करण्याच्या भानगडीत आहेत.ते निवडणुकीचा बिगुल वाजण्याची वाट बघत आहेत.अशी विश्वसनिय सुञाकडुन माहिती मिळाली.लक्ष्मण जगताप आणि महेश दादा लांडगे यांचे वर्चस्व कमी करणारा नेता अजुन तरी महाविकास आघाडी कडे नाहीच

आता भाजपा मध्ये मागे निवडणुकीत निवडुन आलेले नगरसेवकांनी सावध राहा कारण भाजप च्या नियमानुसार काम न करणार्‍या आणि फुगीरी करणार्‍या नगरसेवकांना डबल टिकीट दिले जात नाही.त्या ठिकाणी नवीन इनकमींग केलेल्या किंवा जुन्या उमेदवारांना 2022 ला निवडणुकीत संधी दिली जाते.त्यामुळे राष्र्टवादी मध्ये पक्षांतर होणारी चर्चा निष्फळ असुन माञ भाजप मध्ये इनकमिंग पक्षातंर होणार,आता महाविकास आघाडी ला आताच सावध होऊन काम करावे लागणार आहे बाकी गोष्टी फक्त चर्चेचा विषय आहे.संधी कोणाला आणि जायच कुणाबरोबर या मुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यान मध्ये संभ्रम माञ वाढत चालला आहे.

Previous article..ना बाबर सेना ! ना बारणे सेना ! शिवसेना च !!- खा. संजय राऊत
Next articleविकासनगर येथील महिलेने बदनामी व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत 62 वर्षीय व्यक्तीला घातला 18 लाखांचा गंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 3 =