Home ताज्या बातम्या ..ना बाबर सेना ! ना बारणे सेना ! शिवसेना च !!- खा....

..ना बाबर सेना ! ना बारणे सेना ! शिवसेना च !!- खा. संजय राऊत

110
0

पिंपरी,दि. 9 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आज पिंपरी चिंचवड नगरीत शिवसेनेचे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख खासदार संजय राऊत यांनी पिंपरी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पुर्व पार्श्वभुमीवर भोसरी,पिपंरी,चिंचवड विधानसभे नुसार संवाद मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथे करण्यात आले होते.यावेळी खा. राऊत यांनी कार्यकर्ते नेते यांना मार्गदर्शन केले व पञकारांशी संवाद साधला.त्यावेळी बोलताना म्हणाले पुर्वी शिवसेना माञ नंतर बाबर सेना,व आता बारणे सेना आहे,तर शिवसेना शहरात कधी वाढणार असा प्रश्न पञकारांनी उपुस्थित केला असता,खा.संजय राऊत यांनी सारवासरव करत शिवसेनाच आहे.असे उत्तर देत गटबाजी करणार्‍यांना सुचक विधानकरत टोला लगवला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत यावेळी शिवसेनेचा महापौर बसवायचाच हे ध्येय ठेवून शिवसेना कामाला लागा. आगामी मनपा निवडणूकीत शिवसेनेचे पन्नास नगरसेवक निवडून आणण्यासाठी वातावरण चांगले आहे. पंच्चावन्न आमदारांवर सेनेचे मुख्यमंत्री झाले त्याप्रमाणे पन्नास नगरसेवकांवर पिंपरी चिंचवडचा महापौर करुन दाखवायचा, मागील पाच वर्षापुर्वी भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी चिंचवड अशा घोषणा दिल्या होत्या. पण या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही, तर हा राक्षस जास्त वाढताना दिसत आहे. हाच मुद्दा घेऊन मनपाची निवडणूक शिवसेना लढेल असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले,यावेळी खा. राऊत पुढे म्हणाले की, शहर कसं चालवायचं हे आम्ही दाखवून देऊ की. भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर करुन लोकांना आधार वाटेल अशा पध्दतीने शहर चालवून लोकांना दिलासा देऊ. नागरीकांना वाटलं पाहिजे की, शिवसेना आपली आहे. पिंपरी चिंचवड मनपात एक हाती भाजपाची सत्ता म्हणजे ती सूज आहे. भाजपामध्ये आता असणारे नगरसेवक हे मुळचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आहेत. ते निवडणूकीत पुन्हा बेडूक उड्या मारतात. इथले प्रमुख सगळे ठेकेदारीच्या लिंकमध्ये आहेत. पण शिवसेनेचा हा धंदा नाही. ज्या पध्दतीने इतर शहरात शिवसेनेच्या महापौरांनी काम केले तसे काम येथेही करु. महाराष्ट्रात आघाडी आहे. पण सन्मानाने जागा वाटप झाले तर येथेही आघाडी होईल. पण याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे मुख्यमंत्र्यांकडे आली आहेत. आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा पत्ता सीबीआय, ईडीकडे नाही का ? असा प्रश्न खा. राऊत यांनी उपस्थित केला. पिंपरी चिंचवड मध्ये सुरु असणारा घाणेरडा भ्रष्टाचार म्हणजे जनतेच्या पैशाची लूट आहे. यावर मुंबईत बसणा-या भाजपाच्या नेत्यांनी बोलले पाहिजे. भाजपाच्या नेत्यांना सत्य आणि त्यांच्यावर केलेली टिका सहन होत नाही. याला राजकारण म्हणत नाहीत. केंद्रिय तपास यंत्रणेचा वापर भाजपा सुडबुद्दीने करीत आहे. हे महाराष्ट्राचे राजकारण बिघडवले जात आहे. हि एक प्रकारे दहशतच आहे. या देशात अशा प्रकारची दहशत करणा-या नेत्यांचे नामो निशाण संपले आहे. हे केंद्रिय यंत्रणेची प्रतिष्ठा कमी केल्यासारखे आहे. केद्रांत सहकार खाते निर्माण केले आहे. यावर बोलताना खा. राऊत म्हणाले की, जर सहकार खात्याचा वापर महाराष्ट्राच्या सरकारला, सहकार चळवळीला त्रास देण्यासाठी हे खाते निर्माण केले असेल तर त्याचा आम्ही योग्य वेळी कार्यक्रम करु. नारायण राणे यांची राजकीय गरुडझेप शिवसेनेतून झाली. त्यांना योग्य खाते मिळाले नाही. परंतू ते ज्या खात्याचे मंत्री असतील त्याचे ते चांगले काम करतील असेही खा. राऊत म्हणाले.
नारायण राणे यांनी संजय राऊत यांना काही तरी बोलायचे असते पण चागंले नाही माञ वाईट बोलायचे असते असा प्रश्न केलेल्या होता त्यास राऊत यांनी उत्तर देताना म्हटले की मी कधी वाईट बोलो असेल तर दाखवुन द्या.मी यापुढे बोलणार नाही कुणाशी व राणेना शुभेच्छा दिल्या,शिवसेनेत गटबाजी पाहिला मिळते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत दोन खासदार असतानाही 9 नगरसेवक होते.आता एक खासदार आहे,त्यात पुर्वी शिवसेना माञ नंतर बाबर सेना,व आता बारणे सेना आहे,तर शिवसेना शहरात कधी वाढणार असा प्रश्न पञकारांनी उपुस्थित केला असता,खा.संजय राऊत यांनी सारवासरव करत शिवसेनाच आहे.असे उत्तर देत गटबाजी करणार्‍यांना सुचक विधानकरत टोला लगवला आहे.पे अ‍ॅण्ड पार्क बाबत प्रश्न विचारला असता त्यावर मला माहित नाही मी फक्त वाचले आहे असे म्हणत उत्तर देणे टाळलं,महानगर पालिकेतील गट नेते पद रिक्त होऊन चार महिने झाले माञ त्या बाबत काही घोषणा करतील असे वाटत होते माञ त्यावर कोणतेही चर्चा किंवा माहिती दिली नाही,म्हणजेच शिवसेनेचे माजी गटनेते यांना खा.संजय राऊत व वरीष्ट शिवसेनेच्या नेत्यांचा छुपा पाठींबा आहे.त्यामुळे अद्याप गटनेता पद रिक्त असुन ते कुणालाही दिलेले नाही.शिवसेनेच्या ह्या मेळाव्याला कोवीड-19 च्या नियमावली घालुन दिली त्या पेक्षा जास्त लोक होते,राष्र्टवादीच्या कार्यालय उद्धघाटन प्रसंगी ही कार्यकर्ते जास्त उपस्थित होते,त्यावर पोलिसांनी कारवाही केली.तसेच आजच्या मेळाव्यालाही संख्या जास्त असल्याने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कारवाही करतील का अशी चर्चा शहरातील नागरिंकांन मध्ये रंगली आहे.या पञकार परिषदे वेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार,गटनेते राहूल कलाटे,सह संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड योगेश बाबर, इरफान सैय्यद, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शैला खंडागळे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे,विद्युत सनियंञण समिती पुणे जिल्हा सदस्य तथा चिंचवड विधान सभा शहर संघटक संतोष सौदणंकर,अनंता को-हाळे, धनंजय आल्हाट,नवनाथ तरस,राजेंद्र तरस आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous articleप्रभाग क्र 16 विकासनगर किवळे भागात लोखंडी बोर्ड सहित फ्लेकसबाजी मुळे प्रभागाचे विद्रोपीकरण तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष
Next articleआमदार लक्ष्मण जगताप व महेशदादा लांडगे यांच्या समोर पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडी फिकी आणि कमजोर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 2 =