Home ताज्या बातम्या आयुक्त राजेश पाटील यांचा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांना इशारा त्यांच्या नातेवाईकांनी ठेकेदारी...

आयुक्त राजेश पाटील यांचा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांना इशारा त्यांच्या नातेवाईकांनी ठेकेदारी केल्यास करणार कार्यवाही ;आयुक्त साहेब जागे व्हा नगरसेवक व त्यांचे नातेवाईकांचे ही आहेत ठेके.

63
0

पिंपरी,दि.२५ जून २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांनी नोकरी व्यतिरिक्त अन्य व्यवसाय तसेच बेकायदेशीर कामकाजामध्ये सहभाग घेऊ नये याची पुरेपुर दक्षता घ्यावी. अन्यथा वर्तणूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी संबंधिताविरुध्द नियमाधीन कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गट अ ते ड च्या संवर्गात अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अशा अधिकारी व कर्मचा-यांकडे कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विविध स्वरुपाचे आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज सोपविण्यात आलेले आहेत. दैनंदीन कार्यालयीन कामकाज करीत असताना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा अनेक नागरिक, ठेकेदार व इतर संस्था यांचेशी कामकाजानिमित्त जवळुन संपर्क येत असतो. सदरची कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना विविध प्रलोभने व आर्थिक अमिषे दाखविले जातात किंवा विविध स्वरुपाची कार्यालयीन कामे करण्यासाठी वेळप्रसंगी मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून देखील पैशाची मागणी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी ठरते.
याव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या काही अधिकारी व कर्मचारी यांचेकडून महानगरपालिकेच्या हद्दीत विविध स्वरुपाचे अनधिकृत बिगरपरवाना बांधकामे केलेली असू शकतात अथवा महानगरपालिकेच्या अथवा शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करुन व्यवसाय केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बेकायदेशीर काम होवू शकते अशी शक्यता विचारात घेता, त्यांच्या अशा कृत्यामुळे महानगरपालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन होवून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग होवू शकेल. त्यामुळे अशा स्वरुपाच्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार नाही याची दक्षता एक कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक)नियम १९७९ मधील नियम १६ मधील तरतुदी नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील कोणतोही व्यक्ती एखाद्या व्यापारात अथवा धंद्यात गुंतलेली असेल किंवा व्यवस्था पाहत असेल तर तो तसे शासनास कळविल अशी स्पष्ट तरतुद आहे.तरी जुन्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी.

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे कुंटुबिय (पती/पत्नी/मुलगा/मुलगी) हे स्वत:चा व्यवसाय करीत असल्यास व असा व्यवसाय महापालिका कामकाजाशी निगडीत असल्यास सदरची बाब महापालिकेस वेळीच कळविणे आवश्यक राहील, जेणेकरुन महापालिका अधिकारी/कर्मचारी यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्याने महापालिका कामकाजात सहभाग दिसुन येणार नाही याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेणे आवयक आहे जेणेकरून वर्तणूक नियमाचा भंग होणार नाही.

आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र निर्गत केलेल्या परिपत्रकान्वये, महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी कर्मचारी व उपरोक्त नमूद केलेप्रमाणे त्यांचे कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसाय करीत असेल तर त्याची माहिती महापालिका अधिकारी कर्मचारी यांने महापालिकेस कळविणे बंधनकारक राहील. याशिवाय ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी शासकिय व महानगरपालिकेच्या राखीव जमिनी व मिळकतींवर अतिक्रमण करुन व्यवसाय उभारले असल्यास ते ताबडतोब स्वत:हून स्वखर्चाने काढुन घ्यावेत व तसे महापालिकेस तात्काळ अवगत करावे. तदनंतर असे बांधकाम/ व्यवसाय झाल्याचे अथवा केल्याचे निर्दशनास आल्यास ते तात्काळ निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्यात येवून संबंधिताविरुध्द शिस्त भंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. नमुद केलेप्रमाणे कोणत्याही बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे अथवा नियमबाहय कामामध्ये सहभाग नोंदवु नये याची पुरेपुर दक्षता घ्यावी. अन्यथा वर्तणूक नियमाचा व सदर परिपत्रकाचा भंग केल्याप्रकरणी सबंधिताविरुध्द यथोचित नियमाधीन कारवाई प्रस्तावित करणेत येईल याची सर्व सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी असे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
आयुक्तांनी असेच महानगर पालिकेचे जे प्रतिनिधी निवडुन येतात,त्यांचा ही महापालिकेच्या प्रशासकीय कार्याशी संबध येतो तिथे प्रल्गभोने दिली जातात.अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक आजी माजी तसेच जवळचे नातेवाईक यांची पालिकेत ठेकेदारी अनधिकृत कामे,बांधकामे आहेत,तसेच काही नगरसेवकांनी तर फर्म बनवुन त्यावर कामे चालु आहेत.आयुक्तांनी त्यांची ही चौकशी करावे,लोकप्रतिनिधी वर कान्हाडोळा करु नये.
तसेच ज्यांचे अधिपासुन ठेके आहेत त्याची सदर चौकशी करावी.अन्यथा तो दिवस दुर अ‍ॅन्टी करप्शन ची रेड पडणार नाही.तेव्हा माञ पालिकेच्या आयुक्ताचे दुर्लक्ष होते हे दिसुन येईल.

इथल्या पञकारांबदल इटाळ आहे की काय ?

आयुक्त साहेब शहराच्या जडण घडणीत पञकारांचा ही मोठा वाटा आहे,शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहराच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने आयुक्तांनी पञकारांशी संवाद साधला पाहिजे,किमान आठवड्यातुन एकदा पञकार परिषद घेऊन सर्व पञकारांशी शहाराच्या विकासाच्या दृष्टीने विविध समस्या जाणून घेतल्या पाहिजे.पण नविन आल्यापासुन आयुक्त राजेश पाटील यांनी पञकार परिषद घेतली नाही.पञकारांना सुद्धा क्वचीत एकाद्याला भेटले तर भेटले नाहीतर कुणालाही भेटत नाहीत.जणु त्याना शहराबदल किंवा इथल्या पञकारांबदल इटाळ आहे की काय असा प्रश्न पञकारांना पडलेला आहे.

आयुक्त साहेब आता तरी जागे व्हा,नुसती परिपञके काढुन किंवा नोटीसा देऊन काही होणार नाही.तुमच्या पाठीमागे नंतर सर्व सगनमत करुन आपले जैसे थे राहतील.खासकरुन नगरसेवक व त्यांच्या ठेक्यानवर लक्ष द्या म्हणजे पालिकेतील कर्मचारी भ्रष्ट होण्यापासुन वाचेल.सत्ताधारी आणि विरोधी पक्ष फक्त पालिकेत नावाला आहेत माञ सर्व एकच आहेत त्यामुळे बोलायच कुणाला? पालिकेत विरोधी पक्षाची भुमिका पञकार बजावत आहेत म्हणुन तरी काही गोष्टी प्रकरणे डोळ्या पुढे येतात.त्यात ही काही नगरसदस्यांना

रोष दाखवता येत नाही किंवा विरोध करता येत नाही म्हणुन पञकार कक्षच तोडतात.तर मोकळ्या फ्लोरवर खुर्ची असतात त्याच हालवायला लावतात,जेणे करुन पञकारांना कळले नाही पाहिजे मिलीजुली भगत,त्यात आपले अधिकारी कर्मचारी नगरसेवक व काही ठेकेदार यांचा समावेश आहे.
आयुक्तांनी सर्व पालिका अधिकारी कर्मचारी व नगरसदस्यांची संपत्तीची चौकशी अहवाल नव्याने घ्यावा.अन्यथा भ्रष्टाचार विरोधी व आयकर विभागाच्या कार्यवाही नंतर पालिकेतील भ्रष्टाचार उघड होणारच आहे.भ्रष्टाचार विरोधी व आयकर विभागाची करडी नजर पालिकेवर असुन लवकरच एका अधिकारी कर्मचार्‍यावर कारवाही होण्याची शक्यता आहे अशी सुञांन कडुन माहिती कळते.आयुक्तांनी निर्णय घेतलाच आहे तर तो पुर्ण करावा,जेने करुन शहरातील जनता मोकळा श्वास घेईल.

Previous article“महाराष्ट्र अ‍ॅड. गोवा-नोटरी संघटनेच्या पिंपरी -चिंचवड शहर व मावळ आणि खेड तालुका अध्यक्षपदी अ‍ॅड. अतिश दशरथ लांडगे यांची नियुक्ती”
Next articleओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणा-या मोदी सरकार विरोधात २६ जून रोजी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलनः नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 9 =