पिंपरी,दि. २४ जुन २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- “महाराष्ट्र अॅड. गोवा-नोटरी संघटनेच्या पिंपरी -चिंचवड शहर व मावळ आणि खेड तालुका अध्यक्षपदी अॅड. अतिश दशरथ लांडगे यांची नियुक्ती”
हॉटेल ग्रँड एक्झोटीका आकुर्डी, याठिकाणी महाराष्ट्र व गोवा राज्य नोटरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नोटांच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत चर्चा झाली.
याप्रसंगी या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ॲड राजेंद्र उमाप, (सदस्य बार कन्सिल आज महाराष्ट्र अँड गोवा) कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड सय्यद सिकंदर अली (अध्यक्ष नोटरी संघटना महाराष्ट्र आणि गोवा,सदस्य ,भारतीय सेन्सर बोर्ड )ॲड बाळासाहेब उर्फ यशवंत खराडे( कार्याध्यक्ष नोटरी संघटना) ॲड. प्रवीण नलावडे( सचिव नोटरी संघटना )या मान्यवरांनी आपाले मनोगत व्यक्त केले
ॲड अतीश लांडगे हे जयहिंद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष असून त्यांनी पुणे बारचे खजिनदार तसेच सचिव व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीचे सदस्य या पदावर यापूर्वी काम केले आहे. करोना काळात त्यांनी बार कौन्सिलचे सदस्य ॲड राजेंद्र उमाप यांच्या मदतीने शहरातील वकिलांसाठी आठ ते नऊ लाख रुपये चा निधी व अन्नधान्य किट उपलब्ध करून देण्यात त्यांचा पुढाकार होता .तसेच वकील हक्कासाठी ते नेहमी कार्यरत असतात. बारा वर्षाच्या वकिली कारकिर्दीमध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच गोरगरीब तसेच गरजू लोकांना न्याय मिळवून दिला. येरवडा कारागृह येथे ड्युटी कौन्सिल असताना 300 ते 400 कारागृहातील गरीब बंदीना त्यांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत न्याय मिळऊन दिला. श्री अतिश लांडगे यांच्या कामाचा आढावा पाहून महाराष्ट्र आणि गोवा या असोसिएशन चे कार्याध्यक्ष ॲड बाळासाहेब खराडे व सचिव ॲड प्रवीण नलावडे यांनी श्री लांडगे यांच्या नावाची शिफारस प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे केली होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड गोरक्ष लोखंडे (अध्यक्ष राष्ट्रवादी लीगल सेल )यांनी केले. सदर कार्यक्रमात ॲड एस डी एच काद्री खजिनदार नोटरी असोसिएशन व पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड गोरक्षनाथ झोळ यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रम मध्ये ॲड रूबी चटवाल लिखित डोमेस्टिक व्हायलंस या कायदे पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड नोटरी सेलचे दिवंगत अध्यक्ष ॲड सुनील कड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड ॲड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड दिनकर बारणे ,ॲड संजय दातीर पाटील, ॲड सुभाष चिंचवडे, माजी सचिव ॲड हर्षद नढे ,ॲड अतुल आडसरे यांनी प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी-चिंचवड बार चे माजी अध्यक्ष ॲड. सत्यनारायण चांडक ,ॲड सुहास पडवळ, ॲड सुशिल मंचरकर, ॲड देवराव ढाळे ,ॲड विलास कुटे,ॲड अनिल तेजवानी ,ॲड विजय शिंदे, ॲड सुदाम साने,ॲड सूनील कडुस्कर, पुणे शहर अध्यक्ष ॲड श्रीकृष्ण दीक्षित, कोल्हापूर विभागाचे नोटरी संघटनेचे अध्यक्ष सौ ॲड सोनाली मगदूम ,तसेच ॲड विजय भोसले ,ॲड दीपक ओव्हाळ, ॲड बाळकृष्ण रणपिसे ,ॲड विष्णू तापकीर, ॲड कांता गोरडे, ॲड मुकुंद ओव्हाळ ,ॲड सुरज खाडे, ॲड नीलेश कामठे, ॲड नितीन पवार, ॲड दिपाली लांडगे तसेच बार चे उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे ,सचिव ॲड.महेश टेमगिरे ,ॲड.सुजाता बिडकर, ॲड.मोनिका गाढवे, सहसचिव ॲड.अनिल शिंदे , ॲड.पुनम राऊत, खजिनदार ॲड हरीश भोसुरे ,ॲड सागर अडागळे, ऑडिटर ॲड धनंजय कोकणे ,सभासद ॲड. दिनेश भोईर,ॲड विश्वेश्वर काळजे, ॲड. कृष्णा वाघमारे, ॲड ऋतुराज आल्हाट, ॲड प्राची शितोळे, ॲड. मंगेश नढे,ॲड अनिल पवार, ॲड अजित खराडे, ॲड राजेश रणपिसे ,ॲड प्रिती मंधान ॲड.सूर्या नायर व इतर मान्यवर वकील उपस्थित होते.