Home ताज्या बातम्या परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 18 जूनपर्यंत मुदतवाढ

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 18 जूनपर्यंत मुदतवाढ

42
0

पुणे,दि. १६ जुन २०२१ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे . सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षा करिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्यास दिनांक १८ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) ३०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. सदर परिपुर्ण अर्ज swfs.applications.2122@gmail.com या ईमेलवर पाढवून त्याची हार्ड्कॉपी विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह , समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर सादर करावा. सदर योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे , परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी , निर्वाह भत्ता , आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत . एकाच कुटूंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागु राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल.भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.वार्षिक उत्पन्न रु.६ लाखापेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी संकेतस्तळास भेट द्यावी. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. श्री. प्रशांत नारनवरे आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

Previous articleप्रभाग क्र.16 च्या प्रस्तावीत कामांच्या भुमिपुजना साठी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांची आयुक्तांनी वेळ घ्यावी-नगरसेवक मोरेश्वर भोडंवे
Next articleभिमाकोरेगाव दंगलीत चळवळीतील १४०० युवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे कधी घेणार-अनिताताई सावळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five − three =