रावेत,दि.16 जुन 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-नगरसेवक मोरेश्वर भोडंवे यांनी प्रस्तावित कामांचे भुमीपुजनासाठी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांची नियोजीत वेळ घ्यावी म्हणुन पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांना विनंती पञ दिले.
रावेत प्रभाग क्रमांक-16 मधील विकास कामांना महापालिकेने मंजुरी दिली आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब शनिवारी दिनांक 26 जून रोजी रावेत प्रभागातील नामवंत महाविद्यालयाचे उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत,तरी 26 जुन रोजी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते रावेत प्रभाग क्रमांक 16 मधील मंजुरी मिळालेल्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आपण माननीय अजितदादा पवार साहेब यांची वेळ घ्यावी ही विनंती असे पञात म्हटले आहे.
रावेत प्रभाग क्रमांक 16 मधील मंजुरी मिळालेल्या प्रत्येक कामाचे माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करावयाचे आहे
भुमीपुजन करावयाची प्रस्तावीत कामे-
1) वालेकर वाडी येथील महापालिकेच्या शाळेसाठी प्राधिकरण सेक्टर 30 मध्ये 55 गुंठ्यात उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन
2)सांगवी किवळे बी आर टी एस मार्गा लगत पत्र रेल्वे लाईन पर्यंत साधारण दोन किलोमीटर अंतराचे अर्बन स्र्टीट प्रमाणे पदपथ विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन
3)एमआयडीसी रोड ते भोंडवे बाग पर्यंत असणाऱ्या 24 मीटर रस्त्याचे भूमिपूजन