पिंपरी,दि.१८ जुन २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-१ जानेवारी २०१८ भीमा कोरगावच्या भ्याड हल्या मध्ये आंबेडकरी परिवर्तन चळवळीतील १४०० युवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, प्रमुख सूत्रधार मिलिंद एकबोटे ला अटक व्हावी म्हणून सुप्रीम कोर्ट पर्यंत संघर्ष करून एकबोटेला जेल मद्ये पाठविले परंतु दुसरा आरोपी मनोहर भिडे मात्र मोकाट फिरत आहे त्याची साधी चौकशी सुद्धा नाही झाली म्हणून माझ्या या न्यायलयीन लढाई लढणारे अॅड.योगेश मोरे सर यांच्या सहकार्याने हाय कोर्टामध्ये भिडे संदर्भात याचिका दाखल केली. या प्रक्रियेला खूप विलंब झाला परंतु यामध्ये आंबेडकरी चळवळीतील १४०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत.
काही कार्यकर्ते हे उच्चशिक्षित असून त्यांना शिष्यवृत्तीमध्ये नॉन क्रिमिनल अट लागू केल्यामुळे ते शिष्यवृत्तीस अपात्र ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक दृष्ट्या फार मोठे नुकसान होत आहे. मराठा आरक्षणा मधील मराठा कार्यकर्त्यांवर नोंद झालेले गुन्हे मागे घेतले गेले परंतु भीमा-कोरेगाव हल्ल्यातील १४०० कार्यकर्त्यांवर चे गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. आंबेडकरी चळवळीमधील ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यासाठी परत मोठी लढाई लढण्यास संघर्ष करीत आहोत.येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नांवर मोठ्या स्वरूपात झंझावात निर्माण होईल,वेळ पडल्यास तिव्र अंदोलन देखील करणार असल्याचे भिमाकोरेगाव संघर्ष समितिच्या अध्यक्षा अनिता सावळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा या लढाईसाठी म्हत्वाची ठरेल भीमा-कोरेगाव संघर्ष समिती मध्ये सहभागी व्हा.असे देखील अव्हान सावळे यांनी केले आहे
Home ताज्या बातम्या भिमाकोरेगाव दंगलीत चळवळीतील १४०० युवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे कधी...