Home ताज्या बातम्या देहुरोड- अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार...

देहुरोड- अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार

77
0

देहुरोड,दि.०३ जुन २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी ):- महाराष्र्टात स्ञी अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे,त्यातच देहुरोड शहराला काळीमा फासण्याचे काम काही तरुणानी केले आहे.त्यामुळे देहुरोड परिसरात खळबळ माजली आहे,मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देहुरोड पोलिस स्टेशन परीसरात निर्माण झाला आहे,वेळीच पीडित मुलीने नातेवाईकांना सांगितले अन्यथा कोपर्डी सारखा प्रकार घडन्याची शक्यता नाकारता येत नाही.

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २० वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक खेदजनक घटना देहूरोड शहरात घडली असुन याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलासह चौघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद नुसार आरोपी विरोधात गुन्हा रजि.न.-२९३/२०२१ भा.द.वि कलम ३४२, ३७६ (१), ३७६ (ड), ३७७, ३२३, ५०४, ५०६, १२० (ब), आय.टी ॲक्ट ६७, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ३ (१) (१२) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

१)नोमान उर्फ अरबाज जावेद खान(वय १९) राहणार शितळानगर नं.१ शितळा देवी मंदीरा जवळ मामुर्डी देहुरोड,२)सुलतान उर्फ मुस्ताक सलीम सय्यद (वय ३२), ३)सोहेल शेरअली पिरजादे(वय २१) ,४)रियाज उर्फ मन्नन जावेद खान(वय १९)राहणार आंबेडकर नगर देहुरोड,५)बिट्टु उर्फ हमीद जावेद खान ६)झायेद उर्फ राॅयल निंजा उर्फ सोन्या रशिद खान आरोपी ५ ,६ या दोन अल्पवयीन मुलांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ दरम्यान हा निंदनिय प्रकार घडला आहे.मागील पाच महिन्यापूर्वी पीडित मुलीचे अरोपी सोबत अश्लील व्हिडीओ बनवून तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सर्व आरोपी मिळुन भाग पाडत होते संबंधित आरोपींच्या त्रासाला कंटाळून तरुणीने ही बाब आपल्या नातेवाइकांना सांगितली त्यानुसार आज दि.२ जुन रोजी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनावरांच्या गोठ्यात तसेच देहूरोड शहरातील स्मशानभूमी जवळ असलेल्या निर्जनस्थळी पीडित तरूणीवर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, देहूरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केले आहे. संबंधित प्रकरणातील पीडित तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या कडे असुन देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत

Previous articleआयुक्तसाहेब,कोणाच्या दबावाखाली येऊन पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीबांच्या अन्नात माती कालवताय असा खडा महापौर माई ढोरे यानी विचारला
Next articleअवैद्य बांधकाम, बोगस कागदपत्र व प्रकल्पाबाहेरील लोकाना सदनिका वाटप-डॉ. राजन माकणीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 16 =