Home ताज्या बातम्या अवैद्य बांधकाम, बोगस कागदपत्र व प्रकल्पाबाहेरील लोकाना सदनिका वाटप-डॉ. राजन माकणीकर

अवैद्य बांधकाम, बोगस कागदपत्र व प्रकल्पाबाहेरील लोकाना सदनिका वाटप-डॉ. राजन माकणीकर

0

मुंबई दि.04 जुन 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शिवाजी नगर, हरी नगर प्रकल्पात बोगस कागदपत्र बनवून प्रकल्पाबाहेरील लोकांना सदनिका वाटप केल्याची खळबळ जनक माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

भ्रष्ट प्रकल्प अधिकाऱ्याला हाताशी धरून प्रकल्पात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून बोगस कागदपत्र बनवून प्रकल्पाबाहेरील लोकांना विकासक विमल शहा व त्याचा महादलाल मूर्जी पटेल याच्या मार्फतीने सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

बहुतांश इमारती मध्ये नावापुरती सोडत झालीं असून मूळ झोपडी धारकाला प्रकल्पाचा लाभ न देता शेकडो सदनिकांची विक्री विकासकामार्फत करण्यात आली आहे. इमारत क्रमांक ९ मध्ये नुकतीच ८४ सदनिकांची सोडत केली असून उर्वरित सदनिकांची विक्री करण्यात आली आहे.

याच इमारतीमध्ये ११ दुकाने बेकायदेशीर असून अद्यापही OC देण्यात आलेली नाही, शिवाय वीजपुरवठा चोरीने दिला जात आहे, ४ वर्षापासून भाडे धनादेश नाकारला जाऊन मूळ झोपडी मालक देशोधडीला लागले आहेत, स्थानिक प्रशासन व स्थानिक आमदार यांच्याकडे दाद मागूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे रहिवाश्यांनी कळवले आहे.

हाय पवार कमिटी मंजुरी व नियम अति शर्थी प्रमाणे मनपाला ३८ सदनिका, चौकी व दवाखाना देऊ केला असूनही आजपर्यंत विकासाकामार्फत या अति शर्थी पूर्ण केल्या गेल्या नाहीत.

प्रकल्पग्रस्थ वंचित रहिवाशी यांनी रिपाई डेमोक्रॅटिक चे महासचिव डॉ राजन माकणीकर यांना लेखी पत्राद्वारे प्रकरणाकडे लक्ष वेधून आपल्या विद्रोही पत्रकारिता व आक्रमकते मधून वंचितांना सदनिका मिळवून देण्यासाठी आंदोलनासत सहभाग घेण्यासाठी आग्रह केला आहे.

BMC के पूर्व विभाग, SRA चे संबंधित अधिकारी विकासक विमल शहा, व महादलाल मूर्जी पटेल आणि सोसायटीचे प्रकरनात असलेले पदाधिकारी यांची चौकशी होण्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली.

Previous articleदेहुरोड- अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार
Next articleनांदेडच्या पोलीस निरीक्षकाने केला वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार;गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + fourteen =