पिंपरी-चिंचवड,दि१९ मे २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- महानगरपालिका कार्यक्षेत्रातंर्गत सध्या कोविड-१९ संसर्गाच्या दुस-या लाटेत कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व त्यादृष्टीकोनातून विविध पातळ्यांवर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.अनेक स्वयंसेवी संस्था,उद्योजक,समाजसेव व्यक्ती या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग,प्रभाव,व प्रसार रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतकार्यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढे येत आहेत.
सध्य:स्थितीत उद्धभवलेल्या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक दायित्वाचे भान राखत वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी कोरोना कार्यासाठी ३,००० रुपयांची मदत केली स्वताच्या पगाराच्या निम्मी रक्कम देऊन मदत केल्यामुळे शहरात त्यांचे कौतुक होत आहे.
महापौर माई ढोरे यांनी पवार यांची प्रशंसा केली असून शहराच्या वतीने आभारही मानले आहेत.तसेच भविष्यातील समाजाप्रती सेवाभावी कार्यासाठी तसेच पुढील आयुष्यामध्ये उत्तम आरोग्यगंपदा लाभो अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.