Home ताज्या बातम्या पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार तर एका आरोपीला पोलिसांकडुन अटक

पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार तर एका आरोपीला पोलिसांकडुन अटक

104
0

पिंपरी,दि.12 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली असुन तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. रोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.सदर कोविड प्रार्दुभाव वाढत असुन क्राईम ही दिवसेंदिवस वाढत आहेत,पोलिसांवरील हत्याचार आणि आता राजकीय पुढार्‍यांनावरील गोळीबार पिंपरीतील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे अशी चर्चा शहरभर पसरत आहे.यावर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश काय निर्णय घेतात या कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागुन आहे.

Previous articleकोविड लस सर्वाना मिळणार,नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही-आमदार महेशदादा लांडगे
Next articleपत्रकार भाकरेवर खंडणीचा गुन्हा दाखल,तर स्पर्श प्रकरण पोलिसांसमोर एक अव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + 20 =