Home ताज्या बातम्या कोविड लस सर्वाना मिळणार,नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही-आमदार महेशदादा लांडगे

कोविड लस सर्वाना मिळणार,नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही-आमदार महेशदादा लांडगे

56
0

भोसरी,दि.१२ मे २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोविड व्हॅक्सीन शहरात सुरु असुन पिंपरी-चिंचवडमध्ये ८ केंद्रावर सध्या व्हॅक्सीन लसीकरण सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रासाठी १००० ते १५०० डोस प्रतिदिन उपलब्ध होत आहेत. मात्र, १० ते १५ हजार नागरिक एकाच वेळी स्लॉट बुकींगासाठी प्रयत्न करतात. मागणीपेक्षा लस पुरवठा कमी असल्यामुळे काही मिनिटांत स्लॉट बूक होतात. त्यामुळे नागरिकांनी निराशा पत्कारवी लागत आहे.शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळणार आहे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले असुन.शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली आहे. माञ लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक आहे. नाव नोंदणी केल्यानंतर लसीकरणाची वेळ निश्चित करावी लागते.पण संकेतस्थळावर सर्व स्लॉट काही क्षणातच बूक होतात, अशा अनेक तक्रारी सोशल मीडियाद्वारे प्रत्यक्ष आणि फोनद्वारे येत असल्याने. परिणामी, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.लस स्लॉटबाबत सोशल मीडियातून अनेक तक्रारी येतात. सध्या लसीची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. काही दिवसांतच लस पुरवठा नियमित आणि सुरळीत होईल. शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळणार आहे. बुकींसाठी एकाच वेळी हजारो नागरिक प्रयत्न करीत असतात. त्यामुळे काही क्षणात स्लॉट बूक होतात. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा बुकिंगसाठी संयमाने प्रयत्न करावा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी. यासाठी महापालिका स्थायी समितीने लस उत्पादक कंपनीकडून थेट पद्धतीने १५ लाख डोस खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळावी, यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र दिले आहे. लसीची उपलब्धता वाढवल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.

Previous articleराजकीय नेत्यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळुन आधिकारी पोमण यांचा राजीनामा तर यश सानेची कारवाहीची मागणी
Next articleपिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार तर एका आरोपीला पोलिसांकडुन अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 − three =