Home ताज्या बातम्या पत्रकार भाकरेवर खंडणीचा गुन्हा दाखल,तर स्पर्श प्रकरण पोलिसांसमोर एक अव्हान

पत्रकार भाकरेवर खंडणीचा गुन्हा दाखल,तर स्पर्श प्रकरण पोलिसांसमोर एक अव्हान

41
0

पिंपरी,दि.12 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- स्पर्श नाव ऐकले की कोवीड मधील सावळा गोंधळ असा चिन्हांकीत वातावरण डोळ्या पुढे उभे राहते,त्यातच डाॅक्टरांनी एक लाख रुपये बेड साठी घेतल्यांने खंडणीचा गुन्हा दाखल झालेले प्रकरण ताजे असताना,महानगर पालिकेने स्पर्श कडुन काम काढुन स्वता पि. चि.मनपा कडे ठेवले त्यानंतर शहरभर उलट सुलट चर्चा चालु असताना चौथ्या दिवशी थेट पञकारावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी शहरभर पसरली.

स्पर्श हॉस्पिटल ला बदनाम करण्याची वारंवार धमकी देऊन 5 लाख रुपयांची खंडणी उकळणारा ब्लॅकमेलर पत्रकारावर आज(दि.12 मे) पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पर्श हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल होळकुंडे यांनी यासंदर्भात गुन्हा नोंदविला आहे.शहरातील मोठ्या दैनिकाचा पञकार भाकरे यांचे नाव आल्याने पत्रकाराना जणु धक्काच बसला आहे.कारण शहरातील नामांकीत पञकार म्हणुन सुहास भाकरे यांची ओळख आहे,स्पर्श संस्थेच्या होळकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे स्पर्श संस्थेला कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑटोक्लस्टर चिंचवड येथे कोविड सेंटर चालविण्यास दिले होते. स्पर्श हॉस्पिटल सप्टेंबर 2020 पासून ऑटो क्लस्टर येथे कोरोना रुग्णांवर उपचार 9 मे 2021 पर्यंत करीत होते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काम योग्य प्रकारे करीत असताना दैनिक प्रभात मध्ये काम करणारे पत्रकार सुहास संभाजी भाकरे (वय 43वर्षे) यांनी स्पर्श च्या डॉक्टर्स व संचालक यांचेशी संपर्क साधून ‘माझी आर्थिक मागणी पुर्ण करा. नाहीतर मी तुमच्या संस्थेच्या विरोधात रान उठवेन व तुमच्या संस्थेच्या विरोधात बातम्या देवून तुमच्या संस्थेचे कंत्राट बंद करण्यास भाग पाडेन असे धमकावले. तसेच दिनांक 27/11/2020 रोजी सुहास भाकरे यानी स्पर्षचे संचालक विनोद आडसकर हे अटोक्लस्टर येथे असताना व्हाट्सअप्प व मेसेजद्वारे ‘मी कोवीड केअर सेंटरबाबत तक्रारी करीत आहे. मी तुमची बिले अडकवून ठेवीन. माझ्या मागणीचा विचार करा.’ धमकीवजा मेसेज पाठविला. खोट्या बातम्या प्रसिद्ध करून बदनामी करण्याची वारंवार धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागत असल्याने मेसेज पत्रकारांशी वैर नको या भीतीपोटी स्पर्षच्या विनोद आडसकर यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली, त्यावर सुहास भाकरे याने दोन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले व 3 लाख रुपये स्वतःच्या खात्यावर भगिनी निवेदिता सहकारी बँक नारायण पेठ पुणे या खात्यावर NEFT द्वारे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार आडसकर यांनी रक्कम दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी त्याच्या खात्यावर वर्ग केली आहे. असे संचालक डॉ. अमोल होळकुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भारतीय दंडसंहिता 1860 कलम 384 नुसार पत्रकार सुहास भाकरे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.माञ पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना स्पर्श प्रकरण एक प्रकारे चॅलेंज म्हणुन उभे राहिले आहे.नक्की या स्पर्श प्रकराणात दडलय काय ? का एवढा आटापिटा केला जातोय कोणकोण आहे या सर्व स्पर्श मध्ये सर्वाची चौकशी होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.स्पर्श मागची सत्यता समोर लवकारात लवकर समोर यायला हवी.कोणाच्या तरी जीवावर स्पर्श प्रकरण बेतु नये,त्यापुर्वीच पोलिसांन कडुन ह्या स्पर्श प्रकरणाचा छडा लावला जाईल त्या दृष्टीने पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous articleपिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार तर एका आरोपीला पोलिसांकडुन अटक
Next articleमराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्यसरकारने सहभागी व्हावे- आमदार महेशदादा लांडगे   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − two =