पुणे,दि.05 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी- अमोल डंबाळे,पुणे):- आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागुन होते,मराठा आरक्षण रद्द ठरवल्या नंतर सदावर्तेनी प्रतिक्रिया दिली.मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणारे अॅड गुणरत्ने सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. मी आनंदाने या निकालाचे स्वागत करतो. महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांनी, ज्या प्रकारे माझं, माझ्या कुटुंबाचं समर्थन केलं. माझ्यामागे शक्ती म्हणून उभे राहिले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे सदावर्ते निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.”आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात होऊ नये. महाराष्ट्रात होऊ नये. आम्ही होऊ देणार नाही. माझा आणि माझी पत्नी जयश्री पाटीलचा खून झाला, तरी खुल्या गुणवंतांसाठी लढाई चालू राहील. डंके की चोट पर चालू ठेवू. मराठा संघटना, मराठा पोलीस कर्मचारी-अधिकारी जे कोणी एकत्र येऊन आमचा जीव घेण्याच्या मागे लागले आहेत. आमच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र, देश तुम्हाला जाब विचारेल हे लक्षात ठेवा’ असे अॅड गुणरत्ने सदावर्ते म्हणाले. अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गुणरत्ने सदावर्ते यांनी केली. “अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातून येतात. त्या नांदेडमधील मुखेड तालुक्यात मराठा मसल पावर आहे. तिथे प्रेतालाही लाकडं मिळू दिली नाहीत. ७५ टक्के साखर कारखाने तुमच्या मालकीचे आहेत. बँका मालकीच्या आहे. ९० टक्के मेडीकल कॉलेजेस तुमच्याकडे आहेत. पण दडपशाही करुन आरक्षण घेऊ देणार नाही, ही दडपशाही, राजेशाही चालत नाही” असे सदावर्ते यांनी सांगितले. “हा संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे. हा खुल्या वर्गातील गुणवंतांचा विजय आहे” असे गुणरत्ने सदावर्ते म्हणाले.”मराठा समाजाचे ५२ मार्चे झाले. त्यासाठी आलीशान गाडी मधुन येवुन गर्दी जमवली. देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला” असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. “ही खुल्या गणुवंतांची संविधानासोबतची लढाई होती. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस घोषित केले” असे विधान गुणरत्ने सदावर्ते यांनी केले.