Home ताज्या बातम्या Breaking- नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्यावर कार्यवाहीचे विभागीय आयुक्तांचे आदेश.

Breaking- नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्यावर कार्यवाहीचे विभागीय आयुक्तांचे आदेश.

0

पिंपरी,दि. 3 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंबियांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मास्क पुरवठा निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. याची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन त्यांच्या कंपनीस महानगरपालिकेने रक्कम देखिल अदा केली आहे. अशी तक्रार माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे केली होती.ननावरे यांच्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्तांनी दखल घेतली आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी त्यांचे पद रद्द करुन नगरसेवक म्हणून असलेले सर्व लाभ तात्काळ थांबविणेबाबतची मागणी ननावरे यांनी केली होती. या विषयी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी सदर अर्जावर आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करुन अर्जदार यांना कळविण्यात यावे असे आदेश पुणे विभागीय कार्यालयातून 26 मार्च रोजी प्र. उपायुक्त, नगरपालिका प्रशासन, डॉ. प्रदिप ठेंगल यांनी दिले आहेत. तसे पत्र पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडून ननावरे यांना देण्यात आले.

या विषयी ननावरे यांनी 10 मार्च 2021 रोजी पत्रकार परिषद घेऊन नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्या वेळी ननावरे यांनी असे आरोप केले होते की,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 20 च्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंब सदस्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. महानगरपालिका अधिनियम 11 मधील पोटकलम ‘ड’ किंवा अप्रत्यक्षरित्या कलम 10, पोटकलम (2) खंड (ब) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे महापालिकेचा सदस्य किंवा महापालिकेच्या कोणत्याही समितीचा सदस्य या नात्याने काम करील तर, त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल. मधील तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत धर यांचे पद रद्द होणे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महापालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राव्दारे दि. 10 मार्च 2021 रोजी केली असल्याची माहिती पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली होती.
करोनासंसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू, झोपडपट्टी व कंन्टेन्मेंट झोनमधील रहिवाशांना वाटप करण्यासाठी दहा लाख कापडी मास्क खरेदी करणेकामी पिंपरी-चिंचवड महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. या निविदाप्रक्रियेमध्ये बारा पुरवठाधारकांनी सहभाग नोंदविला होता. या बारा पुरवठाधारांना महापालिकेने मास्क पुरविण्याचे काम विभागून दिले होते. त्यापैकी एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी एक लाख नग कापडी मास्क महापालिकेला पुरविले आहेत.सदर ठेकेदारांपैकी एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदेसोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदर कंपनीच्या महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियम, 1948 अन्वये अस्थापनेच्या नोंदणी दाखल्यावर (शॉप ॲक्ट नोंदणी क्रमांक -1731000311337596) मालकाच्या नावापुढे राजरत्न अशोक शिलवंत (संचालक- रा. 2/9, वल्लभनगर, पिंपरी, पुणे) व इतर संचालक म्हणून शिलरत्न अशोक शिलवंत (रा. 2/9, वल्लभनगर, पिंपरी, पुणे) व राजू नेरंजननाथ धर (रा. नेरांजन व्हिला, अशोका सोसायटी, थेरगाव, पुणे-19) ही नावे आढळून आली आहेत. तसेच उद्योग आधार (क्रमांक- MH26A0056741) मध्ये देखील मालक म्हणून राजरत्न अशोक शिलवंत यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच GOODS AND SERVICE TAX [GST NO–27AAFCR9876H1ZO] सर्टिफिकेटवर श्री. राजरत्न अशोक शिलवंत हे नाव संचालक म्हणून नोंदणी केलेले आहे. या प्रमाणपत्रावर संबंधितांचे छायाचित्रदेखील आहे. मास्क पुरवठा करणाऱ्या एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या कागदपत्रांसोबत अन्न व औषधे प्रशासनाने जारी केलेले ड्रग लायनसेन्सवर राजू निरंजननाथ धर, राजरत्न अशोक शिलवंत व शिलरत्न अशोक शिलवंत यांच्या नावाचा उल्लेख आहे. तसेच या लायसेन्सवर 2/9 प्रॉपर्टी क्रमांक 01299, अशोका कॉम्प्लेक्स, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे -18 असा दर्शविण्यात आला आहे.
सदरील एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भारत सरकारच्या रजिस्टार ऑफ कंपनीज्‌कडे असलेला नोंदणी क्रमांक [CIN] : U24230PN2011PTC138827 असा आहे. सदरील कंपनीचे संचालक म्हणून श्री. राजू नेरंजननाथ धर (DIN 05316432), श्री. राजरत्न अशोक शिलवंत (DIN 03424103), श्री. शिलरत्न अशोक शिलवंत (DIN 05324620) या तिघांचा उल्लेख आहे. वरील तिघेही आजतागायत या कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यरत असल्याचे नोंदणीवरून आढळून
येत आहे,वरील तिघे संचालक हे महापालिकेला मास्क पुरवठा करून आर्थिक लाभ मिळविणारे आहेत. या तिघांच्या एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महापालिकेच्या भांडार विभागाकडून 27 एप्रिल 2020 रोजी एक लाख मास्क पुरविण्याचा पुरवठा आदेश प्राप्त झाला. सदर कंपनीने पुरवठा आदेशानंतर महापालिकेला दहा लाख रुपये किंमतीचे कापडी मास्क पुरविले आहेत. सदरच्या मास्कचे 29 एप्रिल 2020 रोजी महापालिकेला बिल सादर केले. हे बिल महापालिकेच्या भांडार विभागाने 4 मे 2020 रोजी सदर कंपनीला अदा केले आहे. तसेच स्थायी समितीने 17 जून 2020 रोजी कार्योत्तर मान्यता (ठराव क्रमांक 7169) दिलेली आहे. त्यामुळे एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महापालिकेची ठेकेदार कंपनी म्हणून कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.सदर कंपनीवरील तिघे संचालक हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका सौ. सुलक्षणा राजू शिलवंत-धर यांचे नातेवाईक असल्याचेही आढळून येते. एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक श्री. राजू नेरंजननाथ धर (DIN 05316432) हे सौ. सुलक्षणा राजू शिलवंत-धर यांचे पती आहेत. तर श्री. राजरत्न अशोक शिलवंत (DIN 03424103), श्री. शिलरत्न अशोक शिलवंत (DIN 05324620) हे दोघेजण नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांचे सख्खे बंधू आहेत. महापालिका अधिनियम 11 (पालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यास असमर्थता) मधील पोटकलम ड (ज्या बाबींत त्याचा स्वत:चा किंवा आपल्या भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कलम 10, पोटकलम (2), खंड (ब) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे असलेला कोणताही भाग किंवा हिसंबंध असेल किंवा ज्याबाबतीत त्याचा पक्षकाराचा, प्रकर्त्याच्या किंवा अन्य व्यक्तींच्या वतीने व्यवसायिक दृष्ट्या हितसंबंध असेल असे कोणत्याही बाबीसंबंधी चर्चा चालू असताना त्यावेळी मत देऊन किंवा त्यामध्ये भाग घेऊन किंवा अशा बाबींसंबंधी कोणताही प्रश्न विचारून महापालिकेचा सदस्य किंवा महापालिकेच्या कोणत्याही समितीचा सदस्य या नात्याने काम करील तर, त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल) मधील तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत धर यांचे पद रद्द होणे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका सभेत तसेच स्थायी समिती सदस्या म्हणून या विषयाला मंजुरी देत हितसंबंध साधले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर महापालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई तात्काळ होणे आवश्यक आहे.
सुलक्षणा शिलवंत धर यांनी आपल्या नातेवाईकांमार्फत ठेकेदारीच्या माध्यमातून आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या रक्कमेचा गैरफायदा घेण्याचा प्रकारही यातून घडलेला आहे. महापालिकेची प्रतिष्ठाही यातून मलिन झाली आहे. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलेली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. आम्ही उल्लेखित केलेल्या कायद्यांचा आधारे तसेच महापालिका अधिनियमातील नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर सात दिवसांच्या आत कारवाई करून त्यांचे पद रद्द करावे तसेच चौकशी होईपर्यंत त्यांना महापालिकेचे कोणतेही लाभ घेण्यास बंदी आणावी. आपण सात दिवसांत हा निर्णय न घेतल्यास मला न्यायालयात धाव घेऊन न्याय मागावा लागेल, अशी माहिती जिंतेद्र ननावरे यांनी दिली.

Previous article‘एटीएसएस’ कडून डॉ. गिरीश देसाई यांचा सत्कार
Next articleलॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज अन्यथा लाॅकडाऊन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six − 4 =