Home ताज्या बातम्या ‘एटीएसएस’ कडून डॉ. गिरीश देसाई यांचा सत्कार

‘एटीएसएस’ कडून डॉ. गिरीश देसाई यांचा सत्कार

79
0

पिंपरी,दि. 31 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक, डॉ. गिरीश देसाई यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एटीएसएस – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेतर्फे चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एटीएसएसच्या सचिव डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी डॉ. देसाई यांना सन्मानपत्र प्रदान केले. एटीएसएसच्या तंत्रसंचालक डॉ. दीपाली सवाई, आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी आदि यावेळी उपस्थित होते. एमबीए विभागाच्या प्रमुख ॲड. मनीषा कुलकर्णी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
डॉ. अभय कुलकर्णी म्हणाले की, निगडी येथे एलकेजी ते पीएचडीपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पीसिइटीने उभारल्या आहेत. डॉ.देसाई हे पी सी इ टी मध्ये सहयोगी प्राध्यापक ते संस्थेचे कार्यकारी संचालक येथपर्यंत चा टप्पा त्यांनी कायम कठोर परिश्रम, कार्यमग्न, कार्यकुशलता आणि कार्यतत्परता या सुत्रांमुळे गाठला आहे.
कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1990 साली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) ची स्थापना केली. तीस वर्षात या संस्थेने शिक्षण क्षेत्रात स्वत:च्या स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सध्या पीसीईटीचे आकुर्डी आणि रावेत येथे प्रशस्त व अत्याधुनिक सुख, सुविधांनी संपन्न कॅम्पस आहे. येथे केजी टू पीएचडी पर्यंतचे विविध शाखांचे शिक्षण उपलब्ध आहे. सध्या संस्थेच्या आठ शैक्षणिक शाखा आहेत. यामध्ये पीसीसीओई (आकुर्डी), पीसीओई ॲण्ड आर (रावेत), पीसीबी, एसबीपीआयएम, एसबीपीसीओएडी, एसबी पाटील ज्युनियर कॉलेज, एसबी पाटील पब्लिक स्कूल, पुणे बीजनेस स्कूल अशा आठ शाखा तर दहा हजारांहून जास्त विद्यार्थी आणि एक हजारांहून जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे. एस.बी.पाटील स्कूलला ब्रिटीश कौन्सिलची मान्यता आहे. पीसीसीओई या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नॅक’ ची मान्यता आणि ‘एनबीए’ नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन ची मान्यता आहे. एसबीपीआयएम या व्यवस्थापन महाविद्यालयाला देखील ‘नॅक’ची मान्यता आहे. तसेच एसबीपीसीओएडी या आर्किटेक्चर महाविद्यालयाला ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ ची मान्यता आहे.
पीसीसीओई ॲण्ड आर या महाविद्यालयाने सात वर्षात पेटंट नोंदणीचे तीन विश्व विक्रम केले आहेत. पीसीसीओईचा एनआयआरएस रँकींग मध्ये भारतातून पहिल्या दोनशे मध्ये आहे. मागील तीन वर्षापुर्वी पीसीईटी संस्थेने लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांनी स्थापन केलेल्या तळेगाव येथिल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेबरोबर शैक्षणिक व प्रशासकीय सहाय्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्या अंतर्गत पीसीईटीचे व्यवस्थापन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाला शैक्षणिक व प्रशासकीय सहाय्य करीत आहे.
पीसीईटीच्या ‘ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल’ मधून आतापर्यंत तेविस हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला आहे. शिक्षणाचा पर्वत उभा केलेल्या या संस्थेत डॉ. देसाई यांनी कठोर परिश्रम करून शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे.
डॉ. देसाई म्हणाले की, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा यामुळे यश हमखास मिळते. आपण काम करीत असलेली संस्था, सहकारी आणि आपल्या संपर्कात येणा-या प्रत्येकाचे सहकार्य असल्याशिवाय परिपूर्ण यश संपादन करता येत नाही.
डॉ. देसाई यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पीसीइटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाद्यक्ष पद्माताई भोसले, सचिव वि. एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे तसेच आभार डॉ. दीपाली सवाई यांनी मानले.

Previous articleमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला; सायबर गुन्हेगारी कक्षाकडे तक्रार दाखल
Next articleBreaking- नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्यावर कार्यवाहीचे विभागीय आयुक्तांचे आदेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × one =