Home ताज्या बातम्या भांडुपच्या सनराईझ रुग्णालयातील अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा –...

भांडुपच्या सनराईझ रुग्णालयातील अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

73
0

मुंबई दि. 26 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भांडुपच्या ड्रीम मॉल मधील सनराईझ हॉस्पिटल मध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 निरपराधांचा जीव गेला. या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार ने जाहीर केलेला प्रत्येकी 5 लाखांचा सांत्वपरनिधी अल्प असून त्यात वाढ करून 10 लाख रुपये सांत्वनपर निधी द्यावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

अग्निकांडाची माहिती मिळताच दिल्लीहून त्वरित निघून आज दि. 26 मार्च ला रात्री 9 वाजता ना. रामदास आठवले यांनी भांडुपच्या आग लागलेल्या सनराईझ हॉस्पिटल ला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ना रामदास आठवले यांना घडलेल्या अग्निकांडाची माहिती दिली.
ड्रीम मॉल या तीन मजली इमारतीमधील सन राईझ हॉस्पिटल यला काल मध्यरात्री आग लागली.त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.या ड्रीम मॉल इमारतीला ओसी नव्हती तरीही येथे कोविड रुग्णालयाला परवानगी कशी देण्यात आली. भंडारा जिल्हा रुग्णायलयात अग्निकांड होऊन नवजात बालके मृत्युमुखी पडल्याच्या घटनेच्या आठवणी अजून ताज्या असून मुंबईत अद्याप रुग्णायलयांचे फायर ऑडिट झाले नाही. मुंबई मनपा आणि राज्य शासन जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ना. रामदास आठवले यांनी केले आहे. या अग्निकांडाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी पुन्हा अशी अग्निकांडाची घटना घडु यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे आशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

 

Previous articleपिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाच्या अध्यक्ष पदी कलिंदर शेख,उपाध्यक्ष पदी दिलीप देहाडे तर सचिव पदी विकास कडलक यांची निवड
Next articleयश साने ची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी सामाजिक,राजकीय कार्यकर्ते व पत्रकारांनाही कोरोना लस तातडीने मिळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four − two =