Home ताज्या बातम्या विकासनगर- महिला दिनानिमित्त नेञतपासणी शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद

विकासनगर- महिला दिनानिमित्त नेञतपासणी शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद

0

विकासनगर-किवळे,दि.08 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विकासनगर येथील डॉक्टर सुनील वानखेडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे जागतीक महिला दिना निमित्त नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन राजेंद्र तरस सोशल फाऊण्डेंशनच्या वतीने करण्यात आले.हडपसर येथील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नेत्र तपासणी केली असून शिबिराचे मुख्य आयोजक युवा नेते राजेंद्र तरस, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शहर प्रमुख भारत नायडू, नगरसेविका संगीताताई भोंडवे, देहूरोड पोलिस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश रामेकर, शिवसेना देहूरोड शहर सल्लागार देवा कांबळे, किवळे रावेत सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब तरस, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी ताई वानखेडे, सावळाराम वानखेडे,सोशल फाऊण्डेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते,शिबीरार्थी आदी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या हस्ते महापालिका आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना मोफत मास्क व चष्मे वाटप करण्यात आले. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन 157 महिलांनी नेत्र तपासणी केली असुन त्यांना चष्मे वाटप करण्यात आले तर 54 नागरिकांच्या मोतीबिंदूचे निदान करण्यात आले.डाॅक्टरांचे व राजेंद्र तरस यांचे नागरिकांनी अभार व्यक्त केले.

Previous article२०२१-२२ मधील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट-अर्थमंत्री अजित पवार
Next articleमहिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात ही निश्चितच महिलांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब – डॉ. भारती चव्हाण (मानिनी फौंडेशन-भारत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − eight =