Home ताज्या बातम्या लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना योद्धाचा सन्मान कार्यक्रमाचे...

लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना योद्धाचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

78
0

पिंपरी,दि.12 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):– लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या वतीने रक्तदान शिबिर व कोरोना योद्धाचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे सौदागर येथील महादेव मंदीर सभागृहात करण्यात आले.

कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, अगदी काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक नाना काटे यांनी लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. परिसरातील नागरिकांनी देखील या शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला. तसेच कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावणार्या , डाॅक्टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल, तसेच विविध क्षेत्रात काम करणार्या कोरोना योद्धाचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, पिपंरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका सौ शितलताई नाना काटे, माजी नगरसेवक शंकर काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधरभाऊ वाल्हेकर, पीसीएमटीचे माजी सभापती दिलीप बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, तसेच परिसरातील नागरीक व ग्रामस्थ नाना काटे सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous articleज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने ‘बार्टी’च्या मोबाईल ॲप्लिकेशनचे होणार लोकार्पण – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे
Next articleमुन्ना भालेराव यांचे “पळवुन लावला बाजीराव(भीमाकोरेगाव स्पेशल)” गाण का होतय वायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 3 =