Home ताज्या बातम्या 14 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

14 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

47
0

नाशिक, 11 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-नाशिक  जिल्ह्यातील नांदगावात फ्री फायर गेमसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना एका 14 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नाशिक शहरातील भोई गल्लीत बुधवारी 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. स्वरूप असं या मुलाचं नाव आहे. स्वरुपला पबजी गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. नेहमीप्रमाणे स्वरुप रात्री आपल्या घरातील वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. पण सकाळी बराच उशीर झाल्यामुळे तो खाली आला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईने रूममध्ये जाऊन पाहणी केली असता मुलाने गळफास घेतल्याचे आढळून आले.

मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली असता धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी स्वरूपला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि अकास्मित मृत्यूची नोंद केली आहे.

स्वरुपला पबजी गेम खेण्याचे व्यसन होते. पण, अलीकडे पबजी गेमला भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तरूण हे नैराश्यग्रस्त झाल्याची प्रकरणं समोर आली आहे. त्यातूनच आज स्वरुपने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Previous articleशेतकरी संघटनांशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारची दारे सदैव खुली आहेत – नरेंद्र सिंह तोमर
Next articleज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने ‘बार्टी’च्या मोबाईल ॲप्लिकेशनचे होणार लोकार्पण – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =