Home ताज्या बातम्या मावळ- महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजप च्या वतीने वाढीव विजबिलांची होळी

मावळ- महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजप च्या वतीने वाढीव विजबिलांची होळी

65
0

देहुरोड-मावळ,24 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊनमध्ये राज्यभरात अनेकांना महावितरणच्या जास्त वीज बिलाचा फटका बसला. अनेकांनी ही वाढीव बिल भरली देखील. यातून सर्वांना दिलासा मिळेल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले पण अजूनही हे प्रकार संपत नसल्याचे दिसतय.रोजगार,कामधंदा या कोरोना काळात गेल्याने सर्वसामान्य नागरिक बिल कसे भरणार. काहींना पाच हजार ते तब्बल पन्नास हजारांचं बिल महावितरणने पाठवलेच्या घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे बिलाचे पैसे आणायचे कुठुन ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना, शेतकऱ्यांना, हातावर पोट असनाऱ्या सर्वसामान्य परिवाराला पडलाय.राज्य सरकारने ही शब्द फिरवला आहे .कोवीड काळातील सरासरी बिल दुरूस्त करुन वसुली करु नये,बजेटच्या वेळी १०० युनिट पर्यत आर्थिक दुर्बल घटकांना विज माफ करणे आशी वचने देऊन दिशाभुल केलेली आहे.जर राज्यसरकारने वाढीव बिले कमी केली नाही तर देहुरोड शहर भाजपाच्या वतीने आम्ही रत्यावर उतरुन अधिक तीव्र अंदोलन करु, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ व वाढीव विजबिलांची होळी करण्यात आली(दि.23).यावेळी मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा देहूरोड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार, मा.अध्यक्ष कैलास पानसरे, मा.अध्यक्ष मदनसेठ सोनिगरा, मा.अध्यक्ष गुरुमित्तसिंग रत्तू सचिव महिला अध्यक्ष सारिकाताई मुथ्था तुकाराम नाना जाधव, सचिव अंजनी बत्तल, जेष्ठ नेते महावीर बरलोटा,देहूरोड कँन्टोमेन्ट उपाध्यक्ष रघूविर शेलार, नगरसेविका सारिकाताई नाईकनवरे, नगरसेवक राहुल बालघरे, नगरसेवक विशाल खंडेलवाल, पुणे जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष जोगिदर दुमडे, उत्तर भारतीय आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष उमाशंकर सिंग,कँन्टोमेन्ट बोर्डाचे मा.उपाध्यक्ष संजय पिंजण, प्रभारी कैलास राऊत उपाध्यक्ष सुर्यकांत सुर्वे,युवा मोर्चा अध्यक्ष रोहन गायकवाड,व्यापारी संघटना अध्यक्ष विनय बरलोटा, सरचिटणीस सुनिल खाणेकर, दक्षिण भारतीय पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवा कंदस्वामी, शहर अध्यक्ष मुरगन चवालियन, अध्यक्ष दिलिप नायर, युवा मोर्चा चिटणीस अजय अडसुळ व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleदेहुरोड-वीजबिल 50 टक्के माफ करा ; आरपीआयचे लाईटबिल होळी अंदोलन
Next article26 नोव्हेंबर 2020 रोजी शेतकरी-कामगांराचा भारतव्यापी संप; घटना बचाओ! देश बचाओ!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − twelve =