Home ताज्या बातम्या देहुरोड-वीजबिल 50 टक्के माफ करा ; आरपीआयचे लाईटबिल होळी अंदोलन

देहुरोड-वीजबिल 50 टक्के माफ करा ; आरपीआयचे लाईटबिल होळी अंदोलन

54
0

देहुरोड,दि. 24 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार ने मागील 8 महिने लॉकडाऊन केले त्या लॉकडाऊनच्या काळात कोणताही रोजगार कामधंदा नसल्याने सामान्य जनता दुर्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशा काळात राज्य सरकार ने जनतेच्या पाठीशी उभे राहिणे आवश्यक असून वीजबिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही त्यामुळे सरसकट सामान्य जनतेला वीजबिल 50 टक्के माफ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.  वीज वापरली हे खरे असले तरी लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार काम धंदा आर्थिक उत्पन्न नसल्याने गरीब सामान्य माणसांचे हित पाहणे राज्य सरकार चे काम आहे. त्यामुळे वीज वापरली आहे तर सर्व वीज बिल भरा ही राज्य सरकार ची भूमिका चुकीचा आहे.माझे जनतेला आवाहन आहे की जो पर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही तो पर्यंत वीजबिल भरू नए असें ना रामदास आठवले यांनी आवाहन देखील केले आहे.आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विज बिल माफ करण्यासाठी देहुरोड मेन बाजार सुभाष चौक या ठिकाणी लाईट बिल पेटवुन(दि.21) अंदोलन करण्यात आले.या वेळी सिद्धार्थ चव्हाण(आरपीआय वरीष्ठ उपाध्यक्ष मावळ लोकसभा),दिलीप कडलक(आरपीआय कार्यध्यक्ष मावळ लोकसभा),इंद्रपालसिंग रत्तु(आरपीआय उपाध्यक्ष पुणे जिल्हा)सुनिल गायकवाड(आरपीआय शहराध्यक्ष देहुरोड),राहुल गायकवाड(आरपीआय सचिव देहुरोड),सुरेश गायकवाड,अशोक चव्हाण,जस्विदंरसिंग रत्तु,लता ओव्हाळ,नगीना काझी(महिलाध्यक्ष देहुरोड शहर) आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमयत कामगार नलावडे कुटुबांच्या पुर्नवसनासाठी रिपाइंच्या वतीने युनिथर्म इंजिनिअरिंग कंपनीच्या गेटवर निदर्शने
Next articleमावळ- महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजप च्या वतीने वाढीव विजबिलांची होळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + 4 =