भोसरी,दि.18 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मालकाच्या गाडीवर लघुशंका करू नको, असे सांगणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार भोसरी एमआयडीसीतील प्लाॅट नं 86/111 सेक्टर नं 10 मधील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत मंगळवारी (दि. 17)दुपारी घडला.भगवान शंकर वायफळकर (वय 41, रा. दत्तनगर,चिंचवड) असे गंभीररित्या भाजलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (दि. 17) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महेंद्र बाळू कदम (वय 31, रा. बालाजीनगर, भोसरी) असे
अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.गुन्हा रजि.नंबर 502/2020 भा.द.वि.क 307,504,506 नुसार गुन्हा दाखल केला असुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वायफळकर हे भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.मंगळवारी दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास आरोपी कदम हा वायफळकर काम करीत असलेल्या कंपनीचे मालक तिरुमल यांच्या बी एम डब्लु कारवर लघुशंका करीत होता. त्यास फिर्यादी वायफळकर
यांने येथे लघुशंका करू नको, असे सांगितले.
या कारणावरून चिडलेल्या आरोपी कदम याने फिर्यादी वायफळकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून
दिले.या घटनेत वायफळकर हे गंभीररित्या भाजले आहेत. भोसरी एम आय डीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार याबाबत अधिक तपास करीत आहेत.