Home ताज्या बातम्या भोसरी- बालाजी नगर मध्ये सार्वजनीक शौचालयातील पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा.

भोसरी- बालाजी नगर मध्ये सार्वजनीक शौचालयातील पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा.

71
0

भोसरी,दि.17नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भोसरी येथील बालाजी नगर मधील सार्वजनीक शौचालयातील टाकीत सापडला सांगाडा,अद्याप अजुन तो कुणाचा आहे हे समजले नाही.
त्यात मानवी कवटी आणि इतर भागांचा समावेश आहे. सोमवारी (दि. 16) सायंकाळी ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी सांगाड्याची ओळख अद्याप पटली नसून, खून करून मृतदेह टाकीत टाकल्याचा संशय पोलिसांना असुन,तशी चर्चा ही संपुर्ण शहरात पसरली आहे.भोसरीतील बालाजीनगरमध्ये असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत दोन मुले मासे पकडत होती. तेव्हा, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत कवटीसह हाडे आढळून आली.त्यांनी सामाजीक कार्यकर्ते महेंद्र सरवदे यांना सांगितले व तत्काळ एम.आय. डिसी पोलिसांना कळवले.घटनास्थळी पोलिस दाखल झाले.सापडलेली हाडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.त्यानंतर योग्य ती पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली आहे.

हाडे बाहेरून आणून तिथे टाकल्याचा संशय पोलिसांना असून, इतर हाडांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय परिसरात कोणी बेपत्ता आहे का? याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. तसेच या घटनेबाबत स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे. कवटी आणि हाडे पुरुषाची आहेत की महिलेची हे अद्याप समजू शकलेले नाही.अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Previous articleEVM बंदीसाठी जणआंदोलन उभारणार – पँथर डॉ राजन माकणीकर
Next articleभोसरी- मालकाच्या BMW गाडीवर लघुशंका करू नको सांगणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × four =