विकासनगर-किवळे,दि.15 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- परतीच्या पावसाने दि.14 आॅक्टोबरला घूंमसान घातल्याने नागरिकांचे हाल कोरोणाने नेले उरलेले पावसाने नेले संपूर्ण पुणे मुंबई सातारा महाराष्ट्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी शेतकर्याचे नागरिकांचे हाल या पावसामुळे झाले आहे.अनेक ठिकाणी नुकसान सोसावे लागणार आहे. तब्बल दुपारी 03.00 वाजता सुरू झालेला पाऊस हा रात्री पहाटे 5.00 वाजेपर्यंत सुरू होता.
संपूर्ण देहूरोड कॅन्टोन्मेंट शहराचा पाणी नाल्या मार्फत विकास नगर हद्दीतून जाते.पाठीमागे पाऊस झाला तेव्हा ओम पॅराडाईस मध्ये पाणी घुसल्यामुळे नाल्याची दुरुस्तीचे करण्याचं महापालिकेने काम केलं होतं मात्र नाल्याचे पाईप चुकीचे कमी कॅपॅसिटी चे टाकल्याने पाण्याचा विसर्ग या ठिकाणाहून व्यवस्थित होत नाही,मात्र परतीच्या पावसामुळे जो कचरा त्या पाईपात अडकतो व पाणी तुबंंत तिथे माञ पाऊस पडल्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी रस्त्यावर आले,व आजुबाजुच्या परिसरात असणार्या घरानी दुकांनानी पाणी घुसले. मुंबई बंगलोर हायवे लगत सर्व्हिस रोडवर गुरुद्वार ते शिंदे पेट्रोल पंप पर्यंत तसेच नाल्याच्या बाजूने असणाऱ्या सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी साचले अनेकांच्या घरांमध्ये पाणी त्यामुळे येथील नागरिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले हातावर पोट असणाऱ्या काही लोकांचे शांती निवास या ठिकाणी असणाऱ्या घरात ते पाणी घुसले होते पाण्याचे पाईप त्या कॅपॅसिटी नसल्याने कचरा अडकून पाणी पुन्हा रस्त्यावर आले वाशिंग सेंटर गॅरेज शांती निवास व त्यालगतच्या असणारे ठिकाणी संपूर्णपणे साचले होते रात्री दुपारपासून पाऊस चालू असल्याने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र यांनी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात येत्या तीन ते चार दिवस अजून वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस असणार आहे व आता सुद्धा खूप जोरदार पाऊस चालू आहे सर्वांनी सावध रहावं पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडू नका पवना नदीकाठच्या किवळे मामुर्डी भागातील लोकांना विनंती करतो आहे की तुम्ही ही जाग सूत झोपा व सावध रहा पावसामुळे काहीही अडचण आली की राजेंद्र तरस यांच्याशी संपर्क साधा असा मेसेज मोबईल क्रमांक सह सोशल मिडिया च्या माध्यमातुन वायरल केला होता. त्यामुळे विकास नगर च्या अनेक भागातून फोन आले दत्तनगर मध्ये अविनाश शिंदे यांच्या घरात संपूर्ण पाणी शिरले होते त्यांचे नुकसान झाले तसेच मीना कॉलनी व्हिब्स शाळा ते नाल्याच्या बाजूस असणार्या घरात आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले किवळे गावात गावठाणात अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी,असे अनेक भागातून राजेंद्र तरस यांना फोन आले मात्र जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पोहोचलो रात्री एक ते तीन वाजेपर्यंत नागरिकांचे फोन कॉल सुरू होते चारही नगरसेवकांना फोन केला मात्र कोणीही उचलला नाही असे नागरिक सांगत होते.मला फोन केला मी मात्र त्वरित घटनास्थळी जिथे पोहोचणे शक्य आहे तिथे पोहोचून लोकांच्या सेवेत तत्पर राहीलो पाण्यामुळे लाईटचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो किंवा कोणतीही दुखापत होऊ नये ह्या गोष्टी लक्षात घेऊन प्रथम MSEB च्या चौधरी साहेब यांना फोन करून पेंडसे काॅलनी येथील लाईट बंद करण्यास सांगितले व माझ्या स्वतःचा जेसीबी ड्रायव्हर त्याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले जर माझा ड्रायव्हर नसता तर मी काही करू शकलो नसतो जेसीबी ड्रायव्हर प्रकाश चौरशिया याचे सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे रात्री कामावरुन येऊन थकलेला असतानाही फोन केल्या केल्या ताबडतोब ड्रायव्हर हजर झाला व नाल्याचे पाणी काढण्याचा प्रयत्न करून पाण्याची वाट मोकळी करून दिली. पाण्याचा विसर्ग कमी होत गेला आणि लोकांनी विश्वास टाकला त्या विश्वासाला जागे राहुन मी काम करत राहील राहील असे मत राजेंद्र तरस यांनी प्रजेचा विकास शी बोलताना सांगितले
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांच्या रुपाने नागरिकांना ऍक्टिव्ह जनसेवक तत्पर असणारा सामाजिक कार्यकर्ता पाहायला मिळत आहे.
दि.14 आॅक्टोबर राञी चा राजेंद्र तरस फेसबुक लाईव व्हिडीओ