पुणे-देहुरोड,04आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड शहरात मनीषा वाल्मिकी ऐवजी मनीषा यादव ला श्रंद्धांजली जागृत नागरिकाने तरूणी च्या मृत्युपश्चात होणाऱ्या बदनामीचा गैरप्रकार रोखला अशी बातमी मिळताच काय आहे सत्य हे प्रजेचा विकासने तपासले,देहूरोड शहरातील ऐतिहासिक सुभाष चौकात विविध सामाजिक संघटना तसेच पक्षांकडून मनीषा वाल्मिकी या पीडित मुलीला श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु चौकात मनीषा यादव चा फोटो लावण्यात आलेला होता ही गंभीर बाब शहरातील जागृत नागरिक आरटी आय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ मृत्युपश्चात होणारी मनिषाची बदनामी त्वरीत थांबवत चौकात लावण्यात आलेला तिचा फोटो लगेच हटवला तसेच केंद्र सरकार व न्यायालया कडून बलात्कार सारख्या गंभीर प्रकरणात पीडितेची ओळख सार्वजनिक न करण्याचे निर्बधं असतानासुद्धा सदर आदेशा ची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कलम 228( अ )नुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रमेशनं यांनी पत्राद्वारे देहूरोड पोलिसांना केली.
दोन्ही फोटो तपासले असता दोन्ही फोटो वेगळे अढळुन आले
वायरल चेक
उत्तर प्रदेशात हाथरस मधील बलात्कार प्रकरणातील मनीषा वाल्मिकी हिचे क्रूरपणे हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडिया वरती तिच्या नावाने फोटो व्हायरल होत आहे तो फोटो तिचा नसून दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मनीषा यादव चा आहे सदर हा फोटो मनीषा वाल्मिकी च्या नावाने संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वायरल होत असून त्यामुळे मनीषा यादव हिचे वडील मोहनलाल यादव यांनी ह्या फोटो वायरल होण्यावर आक्षेप घेत बुधवारी चंदिगडचे एसएससी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून मुलीचा फोटो सोशल मीडियावर वायरल होण्यापासून थांबवावा व वायरल करणाऱ्या वरती तक्रार दाखल करावी अशी मागणी केली आहे. प्रजेचा विकास ने मिळवलेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळाली की वायरल फोटोमधील मुलगी मनीषा वाल्मिकी नाही तर मनीषा यादव आहे तिचे दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले आहे हा फोटो वायरल झाल्यामुळे यादव फॅमिली पूर्णपणे दुःखी आहे त्यांचे म्हणणे आहे की मुलगी गेल्यानंतर तिला विसरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक पणे पुन्हा एकदा अशा प्रकारे फोटो व्हायरल झाल्याने आम्ही पूर्णपणे दुखी झालो मनीषा यादव मुळची चंदिगडची असून राम दरबार कॉलनीमध्ये राहत होती 21 जून 2018 ला तिचं लग्न झालं होतं
आजारपणामुळे 22 जुलै 2018 ला ती मरण पावली अशी माहिती समोर आली आहे,त्यामुळे पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे पण सर्व गोष्टी तपासुन आपण ती पुढे फाॅर्वड केली पाहिजे.
सदर पीडितेला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व क्षेञातील लोक पुढे येत आहेत माञ उत्तर प्रदेश सरकार निर्णय घेण्यावर उदासीन दिसुन येत आहे.सदर प्रकरणी पीडितेचा आवाज दाबला जात आहे,तिला न्याय मिळालाच पाहिजे या साठी सरकार प्रशासनाला झोपेच्या सोंगातुन बाहेर काढावच लागेल.