Home ताज्या बातम्या पिंपरी-उत्तरप्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु करण्याची पि.चि.शहर...

पिंपरी-उत्तरप्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु करण्याची पि.चि.शहर वंचीतची मागणी

72
0

पिंपरी-उत्तरप्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु करण्याची वंचीतची मागणी
पिंपरी,दि.03 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर व विविध सामाजिक संघटना यांच्या उपस्तिथीत पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी हाथरस,उत्तरप्रदेश या ठिकाणी मनीषा वाल्मिकी या दलित तरुणीवर झालेला सामुहिक बलात्कार, अमानवीय – अमानुष छळ व हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेतील पुरावे नष्ट करणाऱ्या उत्तरप्रदेश राज्य शासनाचा तेथील गृह खात्याचा जाहीर धिक्कार करीत उत्तर प्रदेश मधील दलित व अल्पसंख्याक महिलांवर तसेच इतर महिलांवर होणारे अमानुष अत्याचार पाहता व या संदर्भात शासनाची भारतीय संविधानाच्या विपरीत भुमिका पाहता वर्तमानातील उत्तरप्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी मा. अप्पर तहसिलदार आकुर्डी पिंपरी चिंचवड यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात केली आहे..
मनीषा वाल्मिकी घटनेत पुरावे नष्ट करणाऱ्या उत्तरप्रदेश राज्य शासनाचा व तेथील पोलिस अधिकाऱ्यांचा,कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध करीत गुन्हेगारांना फाशी करण्याची व पुरावे नष्ट करणाऱ्या,गुन्ह्याची नोंद करण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक पोलिसांचे देखील तात्काळ निलंबन करण्यात यावे व हा खटला जलदगती न्यायालयात चालवुन पीडितेला तात्काळ न्याय मिळवुन देण्याची मागणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा. राष्ट्रपती यांना करण्यात आली आहे…
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा. अनिल जाधव, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष. मा. इंजि.देवेंद्र तायडे,महिला आघाडी अध्यक्षा मा. लता ताई रोकडे,कार्याध्यक्ष धनराज बिर्दा यांच्यासह सुनीता शिंदे, मंदाकिनी गायकवाड,निर्मला कांबळे, साधना मेश्राम,मनीषा लष्करे,महासचिव रहीम भाई सय्यद, प्रवक्ते के. डी. वाघमारे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, संघटक अजित चौगुले, उपाध्यक्ष सदानंद माने, उपाध्यक्ष बाबुराव फुलमाळी,बबन सरोदे, धनंजय कांबळे, चंद्रकांत गायकवाड,अमोल माने, आर. डी. किराने,पी. आर. गायकवाड,सुभाष जाधव, राहुल बनसोडे, प्रितम कांबळे, नितीन शिंदे आदी पदाधिकारी व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटना व त्यांचे प्रतिनिधी सामील झाले होत.मा. मानव कांबळे (अध्यक्ष:स्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्य),मारुती भापकर (मा. नगरसेवक ),अनिल लखन (महासचिव:वाल्मिकी समाज संस्था,महाराष्ट्र),आनंदा कुदळे( ओबीसी संघर्ष समिती),संतोष जोगदंड( अध्यक्ष:सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी चिंचवड),बापूसाहेब गायकवाड (अध्यक्ष:भारतीय बौद्ध महासभा पिं. चिं. शहर),संतोष वाघमोडे (राज्य सरचिटणीस: महाराष्ट्र यशवंत सेना),धनाजी येळकर पाटील(संस्थापक अध्यक्ष छावा युवा मराठा महासंघ),दिपाली जाधव (अध्यक्ष:वीरांगना सोशल फौंडेशन पिं. चिं. शहर),महेश बोढखे (अध्यक्ष:झेप फौंडेशन पिं. चिं. शहर),महेंद्र मेनन (अध्यक्ष:आराधना फौंडेशन पिं. चिं.शहर),फास्टर पेट्रास पंडीत ( बेलिव्हर्स चर्च थेरगावं),नीता परदेशी(वुमन्स हेल्पलाईन संघटना),सतीश नायर(सदस्य :कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया),विजय बेद(अध्यक्ष:वंचित बहुजन कामगार संघटना),राधाकांत कांबळे (महासचिव: भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा), मा.मचिंद्र कांबळे ( उपाध्यक्ष: भारतीय बौद्ध महासभा पिं. चिंचवड) आदी संघटना व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleउत्तर प्रदेश हाथरस येतील पिडीत युवतीवर सामोहीक बलकार व हत्याकांडचा निषेर्धात रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवडचे अंदोलन
Next articleउत्तर प्रदेश हाथरस हत्याकांडाच्या निषेर्धात पीडीत मुली ऐवजी दुसर्‍याच मुलीचा फोटो होतोय वायरल;हे थांबवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 2 =