पिंपरी,दि.03आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-हाथरस उत्तर प्रदेश मनीषा वाल्मिकी हत्याकांड विषयी काही प्रमुख मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.पिंपरी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वात अंदोलन घेण्यात आले
१) सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती मार्फत विशेष चौकशी समिती गठित करण्यात येऊन 30 दिवसाच्या आत चार्जशीट तयार करण्यात यावे.
२) सदर खटला उत्तर प्रदेश बाहेर मुंबई, चेन्नई, कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा.
३) मनीषा वाल्मिकी हिचा अंतिम संस्कारच्या नावाखाली महत्वपूर्ण पुनर्तपासणी चे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व त्यांना आदेशित करणाऱ्या मंत्र्यांवर 302 , 120 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी.
४) या घटनेतील फिर्यादी यांचे कुटुंबीय व साक्षीदारांना संपूर्ण संरक्षण देण्यात यावे. अशा मागण्या अंदोलनात होत्या
या वेळी सुरेश निकाळजे शहरध्यक्ष,बाळासाहेब भागवत,
अझीझ शेख, खाजाभाई शेख,शेखलाल नदाफ, यशवंत सूर्यवंशी,मनोज जगतात,हरी नायर,दुर्गाप्पा देवकर
राहुल रोकडे,राकेश वाघमारे,भूषण डूलगूज,प्रदीप जाधव,प्रमोद जाधव,विनोद लाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.