Home ताज्या बातम्या आनंदनगर, चिंचवड स्टेशन झोपडपट्टीमधील लोकांचे आरोग्य धोक्यात – के.एम.बुक्तर

आनंदनगर, चिंचवड स्टेशन झोपडपट्टीमधील लोकांचे आरोग्य धोक्यात – के.एम.बुक्तर

82
0

चिंचवड,दि.30 सप्टेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आनंदनगर चिंचवड स्टेशन ही सर्वात जुनी झोपडपट्टी असून याठिकाणी 10 ते 12 हजाराची लोकवस्ती आहे, कोरोना सारख्या महामारीवर आनंदनगर रहिवाश्यांनी मात केली, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये चिकुनगुण्या या रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे. आरोग्य विभाग लक्ष देत नाही. गटाराची साफसफाई नाही, चेंबर वेळेवर काढले जात नाहीत, दुर्गंधी जास्त प्रमाणात पसरली असल्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढलेला असल्यामुळे सर्व झोपडपट्टीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, म्हणुन संबंधीत क्षेत्रीय अधिकारी य्ंनी आनंदनगर झोपडपट्टीची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्यसेवा सुधरावी.औषध फवारणी, गटार साफसफाई,चेंबरची सफाई इ. अरोग्य सुधारावी अन्यथा आनंदनगर मधील सर्वपक्षीय जनता रस्त्यावर उतरेल आंदोलन करेल याची आधिकार्‍या नोंद घ्यावी असे अहवान रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले) पश्चिम महाराष्र्टाचे उपाध्यक्ष के.एम.बुक्तर यांनी केले आहे.

कोरोना मुळे अगोदरच बेरोजगार असल्या मुळे स्थानिक रहिवाशांना हा आजार परवडत नाही
रहिवाश्यांचे प्रश्न…
१) नेमकं आम्ही करायचं काय??
२) आम्ही जगायचं की नाही??
३) आमची काळजी ही प्रशासनाची आणि स्थानिक लोक प्रतिनिधिंची आहे की नाही??

आंनद नगर रहिवाश्यांच्या मागण्या
१) परिसरात मोफत औषधे व उपचार मिळावा
२) काही दिवस , चांगल्या डॉक्टरांची टीम 24 तास परिसरात ठेवावी
३) दरररोज परिसरात औषध फवारणी करण्यात यावी
४) डास, मच्छर खुप अति प्रमाणात झाले असून दररोज धुराची फवारणी करावी
५) पिण्यासाठी स्वच्छ पाणी सोडावे
६) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, बिस्कीट आदि खाद्यपदार्थ दयावे..

Previous articleभटक्या कुञ्यांचा बंदोबस्त न केल्यास भटकी कुञी पिंंपरी चिंचवड पालिका आयुक्तांच्या आॅफिस मध्ये सोडणार – शहराध्यक्ष धुराजी शिंदे
Next articleखाजगी इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था सेवाभावी सुपूर्द करा. शिक्षकांच्या पगाराच्या नावाखाली फी साठी पालकांना वेठीस धरु नका – आमदार सुनिल शेळके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × four =