Home ताज्या बातम्या राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रलेखन स्पर्धा

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रलेखन स्पर्धा

87
0

पणजी,दि. 24 सप्टेंबर  2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गोवा टपाल विभागाने राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. 09 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान टपाल सप्ताह साजरा केला जाणार आहे. पत्रलेखन स्पर्धा केवळ गोवा विभागापुरती मर्यादीत आहे. ‘पोस्टमन- आपला कोविड योद्धा’ हा पत्रलेखन स्पर्धेसाठी विषय आहे. ही स्पर्धा 18 वर्षांखालील वयोगटासाठी आहे.

स्पर्धक गोवा राज्यातील असावा. स्पर्धकांनी जन्मतारखेच्या पुराव्यासह आपली प्रवेशिक पाठवावी. टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. पत्रलेखनासाठी 500 शब्दांची मर्यादा आहे. प्रवेशिका A4 आकाराच्या पेपरवर पाठवाव्या. स्पर्धेसाठी इंग्रजी, हिंदी, कोंकणी, मराठी भाषेतून पत्रलेखन करता येईल. पत्र पाठवण्यासाठी अंतिम दिनांक 09 ऑक्टोबर 2020 आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 3000/,  2000/- 1000/- रुपयांचे पारितोषक दिले जाईल. पत्रलेखन वरिष्ठ टपाल अधीक्षक, गोवा विभाग, पणजी 403001 या पत्त्यावर पाठवावे.

Previous articleइंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकाचा निधी कोविडसाठी वापरावा-प्रकाश आंबेडकर
Next articleमहामार्ग बांधणीत सुलभता आणण्यासाठी NHBF कडून आलेल्या 25 सूचनांना NHAI ची मान्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 + nineteen =