Home ताज्या बातम्या अत्यावश्यक सेवेत घेण्याच्या अश्वसनावर अंदोलन तुर्तास मागे घेतले,मागण्या मान्य न झाल्यास तीव्र...

अत्यावश्यक सेवेत घेण्याच्या अश्वसनावर अंदोलन तुर्तास मागे घेतले,मागण्या मान्य न झाल्यास तीव्र अंदोलन करु – नितीन गवळी

39
0

पुणे,दि.18 सप्टेबंर 2020( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-प्रकाश बुक्तर):- मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन पुणे पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिल्हाआधिकारी कार्यालयावर धरणे अंदोलन करण्यात आले,नितीन गवळी,महेश देशपांडे,विजय दगडे,संजय कांबळे,शैलेश गायकवाड व इतर असे शिष्ट मंडळाने जिल्हा अधिकारी व संबधीत अधिकारी यांना भेटुन चर्चा करुन निवेदन दिले. अत्यावश्यक सेवेत घेणार व कर्यालयाच्या लोकांच्या कॅप्यसिटीच्या 50% लोक उपस्थितीला परवानगी देण्याचे अश्वासन दिल्या नंतर तुर्तास अंदोलन 12.30ला मागे घेण्यात आले,परंतु आॅक्टोबंर महिन्या अखेर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंडप ओनर्स वेलफेअर अशोसिएशन च्या वतीने तिव्रे अंदोलन करण्यात येईल.अशी माहिती प्रजेचा विकास साप्ताहिक व आॅनलाईन न्युज चॅनलला असोसिएशनचे खजिनदार नितीन गवळी यांनी दिली.

मंडप, फुल सजावट व्यवसाय, लाईट व्यवसाय, ध्वनिवर्धक, मंगल कार्यालय व्यवसाय चालू करणे बाबत निर्बंध उठविणे अथवा शिथील करणेबाबत शासनाने विचार करावा. जिल्हाधिकारी साहेब यांस या पत्रक निवेदन देण्यात आले, कोरोना महामारी च्या काळात अनेक व्यवसाय बंद होते सदर व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत परंतु मंडप लाईट ध्वनिवर्धक मंगल कार्यालय हे व्यवसाय चालू करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत सदर निर्बंधांमुळे व्यवसाय सुरू करण्यास अथवा चालू ठेवण्यात प्रचंड अडचणी येत आहेत यामध्ये बँक कर्ज हप्ते फेडण्यात अडचण निर्माण होत आहे या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता मंडप ओनर्स वेलफेअर असोसिऐशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या मागण्या शासनाने त्वरीत सोडवाव्यात व मंडप व्यवसायिकाना दिलासा द्यावा. अंदोलनाला संजय भाऊ कांबळे,विजय दगडे (संस्थापक अध्यक्ष), महेश देशपांडे(अध्यक्ष),नितीन गवळी(खजिनदार),राहुल मनोत (उपाध्यक्ष),नंदकिशोर तोवर(कार्याध्यक्ष),राजेंद्र कलापुरे(सेक्रेटरी), अनुप कोठावळे (साऊंड लाईट अध्यक्ष पिं. चिं.),सिद्धार्थ निकम, निलेश आहेर,प्रदीप नेवाळे,अभिजीत काळभोर,प्रशांत सूर्यवंशी,गणेश कानगुडे,
गणेश तांबे,योगेश डोके,राजू चेटियार,रवींद्र बाफना,मारुती भोसले,निलेश कुसाळकर,पॉल नायर,अशोक ढोरे,
शंकरसिंग तोवर,रवी चाटीयार,अनिल विटकर,अाकाश लगडे,दीपक शिंदे,केशव गोर,सुधाकर कांबळे,रामदास सावंत,सचिन कांबळे,कदीर शेख,नंदकिशोर लुळे,आनंद नलवडे,अनिकेत शिंदे,सनी चंद्राणी,अनिल विटर,मधुकर काळे,मनीष डोळस,मिलिंद पांडे,हेमंत कोठावडे,सागर कोतवाल,रोहिदास खटाटे,बाळूमोहोळकर,अशिष जगताप,सुशील कांबळे आदी.पदाधिकारी कामगार मालक चालक उपस्थित होते.

मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन च्या प्रमुख मागण्या.
1. व्यवसाय वरील निर्बंध शिथिल करणे.
2. मंडप व्यवसाय अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करणे.
3. मंगल कार्यालयातील उपस्थित लोकांची संख्या वाढविणे.
4. बँक कर्ज हप्ते वसुली बाबत शीतलता मिळणे .
5. मंगल कार्यालय मध्ये जास्त उपस्थिती असल्यास मंडप व इतर व्यावसायिक यांच्यावर कारवाई न करणे बाबत.

Previous articleमंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे उद्या 18 सप्टेबर ला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंदोलन – विजय दगडे (संस्थापक अध्यक्ष)
Next articleफायदेशीर शेतीचे स्वरुप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − eight =