Home ताज्या बातम्या मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे उद्या 18 सप्टेबर ला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंदोलन...

मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे उद्या 18 सप्टेबर ला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंदोलन – विजय दगडे (संस्थापक अध्यक्ष)

0

वाल्हेकरवाडी,दि.17 सप्टेबंर 2020( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनची वाल्हेकर वाडी येथे (दि.16 सप्टे) पञकार परिषद घेण्यात आली,मंडप, फुल सजावट व्यवसाय, लाईट व्यवसाय, ध्वनिवर्धक, मंगल कार्यालय व्यवसाय चालू करणे बाबत निर्बंध उठविणे अथवा शिथील करणेबाबत शासनाने विचार करावा.जिल्हाधिकारी साहेब यांस या पत्रक निवेदन देण्यात येणार आहे, कोरोना महामारी च्या काळात अनेक व्यवसाय बंद होते सदर व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत परंतु मंडप लाईट ध्वनिवर्धक मंगल कार्यालय हे व्यवसाय चालू करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत सदर निर्बंधांमुळे व्यवसाय सुरू करण्यास अथवा चालू ठेवण्यात प्रचंड अडचणी येत आहेत यामध्ये बँक कर्ज हप्ते फेडण्यात अडचण निर्माण होत आहे या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता मंडप ओनर्स वेलफेअर असोसिऐशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या मागण्या सरकारी पातळीवर पोहोचविण्यासाठी शुक्रवार दिनांक 18.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजता पुणे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विजय दगडे यांनी पञकार परिषदेत माध्यम प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

यावेळी संजय भाऊ कांबळे,विजय दगडे (संस्थापक अध्यक्ष), महेश देशपांडे(अध्यक्ष),नितीन गवळी(खजिनदार),राहुल मनोत (उपाध्यक्ष ),नंदकिशोर तोवर(कार्याध्यक्ष),राजेंद्र कलापुरे(सेक्रेटरी), अनुप कोठावळे (साऊंड लाईट अध्यक्ष पिं. चिं.),सिद्धार्थ निकम, निलेश आहेर,प्रदीप नेवाळे,अभिजीत काळभोर,प्रशांत सूर्यवंशी,गणेश कानगुडे,गणेश तांबे,योगेश डोके,
राजू चेटियार,रवींद्र बाफना,मारुती भोसले,निलेश कुसाळकर,पॉल नायर,अशोक ढोरे,शंकरसिंग तोवर,रवी चाटीयार,अनिल विटकर,अाकाश लगडे,दीपक शिंदे,केशव गोर,सुधाकर कांबळे,रामदास सावंत,
सचिन कांबळे,कदीर शेख,नंदकिशोर लुळे,आनंद नलवडे,
अनिकेत शिंदे,सनी चंद्राणी,अनिल विटर,मधुकर काळे,
मनीष डोळस,मिलिंद पांडे,हेमंत कोठावडे,सागर कोतवाल,रोहिदास खटाटे,बाळूमोहोळकर,अशिष जगताप,सुशील कांबळे उपस्थित होते

मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन च्या प्रमुख मागण्या.
1. व्यवसाय वरील निर्बंध शिथिल करणे.
2. मंडप व्यवसाय अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करणे.
3. मंगल कार्यालयातील उपस्थित लोकांची संख्या वाढविणे.
4. बँक कर्ज हप्ते वसुली बाबत शीतलता मिळणे .
5. मंगल कार्यालय मध्ये जास्त उपस्थिती असल्यास मंडप व इतर व्यावसायिक यांच्यावर कारवाई न करणे बाबत.

Previous articleऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष
Next articleअत्यावश्यक सेवेत घेण्याच्या अश्वसनावर अंदोलन तुर्तास मागे घेतले,मागण्या मान्य न झाल्यास तीव्र अंदोलन करु – नितीन गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 7 =