Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले) पक्षाच्या मावळ लोकसभा कार्यध्यक्ष पदी दिलीप कडलक...

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले) पक्षाच्या मावळ लोकसभा कार्यध्यक्ष पदी दिलीप कडलक तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी सिद्धार्थ चव्हाण यांची निवड

136
0

दि.1सप्टेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची तालुक्याची महत्वपूर्ण बैठक आज (दि.31आॅगस्ट)संपन्न झाली या बैठकीमध्ये तळेगाव शहर,देहुरोड शहर आणि तालुका व जिल्हातील ग्रामीण विभागात पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून रुपरेषा ठरवण्यात आली आणि त्याचा भाग म्हणून देहुरोड शहरातील ज्येष्ठ नेते यांच्या वरती म्हत्वाची जबाबदारी देण्याची व पक्ष पुढे नेण्यासाठी काही म्हत्वाची पद देण्याचे मागणीचे निवेदन मावळ तालुका पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,देहुरोडचे अध्यक्ष सुनील गायकवाड आणि पक्षाच्या जिल्ह्याचे पदाधिकारी उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तु,संघटक बाबू दुधघागरे व सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा अध्यक्षाकडे प्रस्ताव सादर केला या प्रस्तावामध्ये देहुरोड विभागातील आंबेडकरी चळवळीतील समाजातील प्रमाणीक निष्ठावंत कार्यकर्ते

 

 दिलीप कडलक

यांची मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कार्यध्यक्ष पदी

तर

 

सिद्धार्थ चव्हाण यांची मावळ लोकसभा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी

 

निवड जाहीर करण्यात आली.देहुरोड कॅन्टोन्मेट हाॅस्पीटल येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते पञ देण्यात आले.या वेळी मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,देहुरोड शहर अध्यक्ष सुनील गायकवाड,पुणे जि उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तु,गणेश गायकवाड(सरचिटणीस पुणे जि),बाबु दुधघागरे(संघटक पुणे जि),राहुल भिमराव गायकवाड,अशोक चव्हाण,बाबु नायडु,चंद्रकांत शिंदे,मिलींद भालशंकर,शिवाजी भंडारे,विठ्ठल चव्हाण,सर्जेराव शिंदे,जसविंदर सिंग रत्तु,अनिल इंगळे,मंजुनाथ खोत आदी.पदिधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous articleकष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांना विधानपरिषदेवर आमदार करावे- राहुल डंबाळे
Next articleपिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयूक्त पदी आयर्न मॅन कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − twelve =