Home ताज्या बातम्या कष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांना विधानपरिषदेवर आमदार करावे- राहुल...

कष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांना विधानपरिषदेवर आमदार करावे- राहुल डंबाळे

77
0

पिंपरी,30 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी होणाऱ्या निवडीमध्ये राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन न करता खऱ्या अर्थाने निस्पृह समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना लोकप्रतिनिधीत्व ची संधी मिळणे आवश्यक असूनक ष्टकरी समाजाचे गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे कष्टकरी कामगार पंचायत चे नेते बाबासाहेब कांबळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावे अशी मागणी राज्यातील आंबेडकरी चळवळीच्या अनेक संघटना पक्षांकडुन होत आहे. त्याबाबतचा सर्व पत्र व्यवहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुल जी गांधी,शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे करण्यात येत आहे.

आज पिंपरी येथे कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावे यासाठी विविध पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जनसमर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनसमर्थन मेळाव्यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी आपली भूमिका व्यक्त करताना राहुल डंबाळे यांनी सांगितले,विधानपरिषद हि नापासांची शाळा करण्याचा प्रयन्त सरकारचा दिसुन येत आहे राजकीय नेतृत्वाना त्याठिकाणी बसवण्याचा घाट दिसत आहे,त्यात कोरोनाव्हायरस नंतरच्या परिस्थितीनुसार असंघटित क्षेत्रातील कामगार कष्टकरी लोकांचे जगणे असह्य झाले असून कोट्यावधी जनतेला आपल्या रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे ही परिस्थिती पुढील अनेक वर्षे राहणारी असल्याने या वंचित व उपेक्षित घटकांचा आवाज विधान परिषदेमध्ये असणे अत्यावश्यक झाले आहे. 40 टक्क्यांपेक्षा अधिक ची महाराष्ट्रातील लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे,म्हणुन त्यांचा लोक प्रतिनिधी बाबा कांबळे यांच्या रुपाने विधिमंडळात असल्यास या समुदायांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होतील,बाबा कांबळे ह्यांनी रिक्षावाल्यांचे प्रश्न,मोलकरणींचे प्रश्न,पथारी वाल्यांचे प्रश्न अशा पद्धतीने असंघटीत लोकांचे प्रश्न सोडवत असतात.त्यामुळेच महाराष्ट्रातील तमाम असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पक्ष संघटनांसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय आंबेडकरी चळवळीच्या वतीने घेण्यात आलेला आहे. याप्रसंगी बाबा कांबळे यांनी आपले मत व्यक्त करताना सामान्य जनतेकडून विशेषता स्वतंत्रपणे पक्षसंघटना चालवणाऱ्या नेत्यांकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आमदारकीची मागणी होणे हा असंघटित क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून करत असलेल्या कामाचा माझा गौरव मी समजत आहे. आणि खरोखरच कधी नव्हे इतकी गरज आज असंघटित क्षेत्रातील लोकांच्या लोकप्रतिनिधी त्याची निर्माण झालेली आहे. सध्याचे सरकार हे गोरगरीब जनतेसाठी काही करू इच्छित आहे.असे वेळोवेळी जाणवत आहे.त्यामुळे सरकारने जर आम्हाला संधी दिल्यास आमदारकीच्या बळावर राज्यातल्या असंघटित क्षेत्रातील तसेच कष्टकरी क्षेत्रातील कोट्यावधी जनतेचे प्रश्न संसदीय लोकशाही प्रणाली च्या माध्यमातून सोडवणे शक्य होईल.रिक्षासंघटना नागपुर,जळगाव उत्तर महारष्र्ट,पुणे असे संपुर्ण रिक्षा संघटनाच्या प्रतिनिधीनी विधानपरिषदेवर बाबा कांबळे ना संध द्या असा निर्णय घेतला आणि मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने केल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद देखील बाबासाहेब कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.असंघटीत कामगारांना पेन्शन,रिक्षावाल्यांचा इन्शोरन्स हा मंडळा कडे वळवावा जेने कि रिक्षा वाल्यांना पेन्शन मिळवुन देऊ,सामाजीक सुरक्षेचा कायदा करण्यास भाग पाडु असा अजेंडा माझा असेल असे त्यांनी पञकार परिषदेत सांगितले,यावेळी खालिल संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

रिपब्लिकन रिपब्लिकन युवा मोर्चा,भीमा कोरेगाव सामाजिक संघटक समिती,समाजवादी पार्टी,कष्टकरी कामगार पंचायत,महाराष्ट्र रिक्षा पंचायत,टपरी पथारी हातगाडी पंचायत,बांधकाम कामगार मजूर पंचायत,धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्था,अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती, मैत्री चळवळ महाराष्ट्र,भारतीय गणराज पार्टी,भिम छावा संघटना,माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समिती,बहुजन संघटक सोशल मीडिया महाराष्ट्र,दलित पँथर,अमर ज्योती मित्र मंडळ,लोकशाही संस्था,अपना वतन संघटना,बहुजन प्रेरणा सामाजिक बौद्ध ट्रस्ट,बहुजन सम्राट सेना अशा 20 संघटना सहभागी होत बाबा कांबळे यांना पाठिंबा दिला.

Previous articleदेहुरोड मध्ये उपोषण मागे घेण्यासाठी व्यापार्‍याकडे दोन लाखांची मागणी ; उपोषणकर्ते अमित माणिक छाजेड वर गुन्हा दाखल
Next articleरिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले) पक्षाच्या मावळ लोकसभा कार्यध्यक्ष पदी दिलीप कडलक तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी सिद्धार्थ चव्हाण यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × five =