Home ताज्या बातम्या देहुरोड मध्ये उपोषण मागे घेण्यासाठी व्यापार्‍याकडे दोन लाखांची मागणी ; उपोषणकर्ते अमित...

देहुरोड मध्ये उपोषण मागे घेण्यासाठी व्यापार्‍याकडे दोन लाखांची मागणी ; उपोषणकर्ते अमित माणिक छाजेड वर गुन्हा दाखल

57
0

देहुरोड,दि.29 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड शहरामध्ये अनाधिकृत बांधकामाविरोधात उपोषणास बसलेल्या अमित माणिक छाजेड यांनी उपोषण मागे घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे केली दोन लाखाची मागणी याविरोधात 17 व्यापारी एकत्र येऊन देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये अमित माणिक छाजेड व इतर विरोधात गुरनं 607/2020 भादवि कलम 385,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,17 व्यापारी यांच्यावतीने व्यापारी संघटना अध्यक्ष या नात्याने विनय महावीर बरलोटा (वय 33) राहणार लेखा फार्म किवळे देहूरोड यांनी 28 ऑगस्ट 2020रोजी सायं 08.05 मिनिटांनी फिर्याद दिली आहे.

सदर घटना 27 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता सुभाष चौक मेन बाजार या ठिकाणी घडली असून आरोपी अमित छाजेड यांनी देहूरोड व्यापारी संघटना अध्यक्ष यांना भेटायला बोलावले होते त्यावेळी विनय महावीर सवाना चौक येथे भेटायला आले त्यावेळी फिर्यादी यांनी सांगितले की मला सर्व व्यापारी संघटनांकडून दोन लाख रुपये द्या मी उपोषण मागे घेतो नाहीतर मी तुमच्यावर अॅट्रोसिटी दाखल करेन अशी धमकी दिली व आरोपीने पुन्हा फोन करून दोन लाखाची मागणी केली त्यामुळे सर्व व्यापारी भयभीत झाले होते सदर प्रकरणात 17व्यापारी एकञ येत देहुरोड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.आरोपीने अतिक्रमण संदर्भात केलेले उपोषण मागे घेण्यासाठी सर्व व्यापारीनां दोन लाख रुपयांची मागणी करून सर्व व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्रास देत आहे,म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा फिर्यादी हे 28 आॅगस्ट तारखेला गुन्हा उशिरा दाखल झाला.सदर अरोपी अजुन अटक नाही या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक हाबळे यांच्याकडे असून देहुरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदर अरोपी हे आर.पी.आय (अठवले) गटाचे आहेत असे त्यांच्या फलक व पञकावरुन दिसुन आले,पण मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण शंकर भालेराव असताना दुसरा मावळ तालुका अध्यक्ष कसा असा सभ्रंम देहुरोड शहरातील लोंकान मध्ये निर्माण झाला आहे.त्यामुळे पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,व मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव हे पक्षांतर्गत काय कारवाई करतील या कडे सर्व व्यापारी वर्गाचे व देहुरोड करांचे व आरपी आय देहुरोड शाखेचे लक्ष लागुन आहे.त्यामुळे देहुरोड मध्ये या उपोषण प्रक्रिये बदल उलट सुलट चर्चे ला उधाण आले आहे.

Previous articleअवघ्या सात महिन्यातच पुन्हा एकदा IAS तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली ; नागपुर महापालिकेतुन थेट मंञालयात
Next articleकष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांना विधानपरिषदेवर आमदार करावे- राहुल डंबाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + seventeen =