Home ताज्या बातम्या अवघ्या सात महिन्यातच पुन्हा एकदा IAS तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली...

अवघ्या सात महिन्यातच पुन्हा एकदा IAS तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली ; नागपुर महापालिकेतुन थेट मंञालयात

47
0

नागपुर,दि.26 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदी असलेल्या तुकाराम मुंडे यांची आता मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची यावर्षी जानेवारी महिन्यात नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता अवघ्या सात महिन्यातच त्यांची पुन्हा एकदा मुंबईत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या जागी नागपूरच्या आयुक्तपदी राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली करण्यात आली आहे. आपल्या धडाडीच्या निर्णयाने ते नेहमीच चर्चेत देखील असतात.तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीबद्दल ओळखले जातात. यामुळेच त्यांची अनेकदा बदलीही झाली. या वर्षी जानेवारीमध्ये ते नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी विराजमान झाले होते. २००५च्या बॅचचे ते आयएएस ऑफिसर आहेत. त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे अनेकदा त्यांचे नगरसेवक असो वा इतर राजकीय अधिकाऱ्यांशी वाद झाले आहेत. नाशिक महापालिकेत आयुक्त असताना मुंढे यांचा नगरसेवकाशी वाद झाला होता. तर नवी मुंबई महापालिकेत नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव देखील आणला होता.

तुकाराम मुंढे यांनी सुरुवातीला नवी मुंबई मनपाचे आयुक्तपद सांभाळले होते. नंतर त्यांची नाशिक मनपाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. दोन्ही पालिकांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थानिक पातळीवर त्यांना तीव्र विरोध सुरू होता त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. नवी मुंबई मनपात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पुढाकाराने आयुक्त मुंढे यांच्याविरोधात पालिकेत अविश्वास ठराव देखील आणण्यात आला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या अधिकारात बरेच दिवस हा ठराव रोखून धरला होता. अखेर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात या विषयावर थेट चर्चा झाली होती. ज्यानंतर फडणवीस यांनी मुंढे यांची बदली पीएमपीएलच्या संचालकपजी करण्यात आली होती.

दरम्यान, जानेवारी महिन्यातच आयुक्तपदी नियुक्त झालेले मुंढे यांचे नागपूर मनपामध्ये सत्ताधारी भाजप तसेच इतर पक्षांच्या नगरसेवकांसोबत वाद होत होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंढे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि शिस्तप्रिय कारभाराचे जाहीर कौतुक केले होते. तसेच मुंढे यांना पाठिंबाही जाहीर केला होता. तुकाराम मुंढे जनहिताचे निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे पालिकेतील लोकप्रतिनिधींशी चर्चा न करता, त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात आणि अंमलात आणतात अशी तक्रार नागपूरच्या महापौरांनी केली होती. तुकाराम मुंढे फोन उचलत नाहीत, भेटायला गेल्यास बाहेर थांबवून ठेवतात अशाही तक्रारी करण्यात येत होत्या. अखेर आज तुकाराम मुंढे यांची नागपूरहून थेट मुंबईत बदली करण्यात आली आहे.

Previous articleमंदिर ;मस्जिद ; चर्च ; बुद्धविहार सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Next articleदेहुरोड मध्ये उपोषण मागे घेण्यासाठी व्यापार्‍याकडे दोन लाखांची मागणी ; उपोषणकर्ते अमित माणिक छाजेड वर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 6 =