देहुरोड,दि.9 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या 14 वर्षाच्या मुलाने बनविल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती,हाताने कोणताही साचा नसताना शाडु मातीची भरीव मुर्ती बनवल्या आहेत. यश नितीन गरुड हे या मुलाचे नाव असून देहूरोड येथील साईनगर परिसरामध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्यास आहेत.
थॅलेसेमिया हा आजार आई-वडिलांकडून अनुवंशिकतेने बालकांपर्यंत येतो थॅलेसिमिया मध्ये दोन प्रकार आढळतात मेजर थॅलेसेमिया आणि मायनर थॅलेसेमिया यामुळे रक्त वाढ होत नसल्याने वारंवार रक्त भरावे लागते रक्ताच्या कमी मुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण शरीरात कमी होते व त्यामुळे विकार वाढण्याची संभावना असते त्यामुळे अशा मुलांना व व्यक्तींना रक्त शरीरात वारंवार भरावे लागते.
आई शिवणकाम व वडील ड्रायव्हर असल्याने अर्थिक परिस्थिती बेताची आहे व उपचारासाठी आर्थिक नियोजन कमी पडते त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून मुलाकडे मूर्ती बनवण्याची कला अवगत असल्याने त्याने काही प्रमाणात गणेश मुर्ती बनविल्या आहेत. लॉक डाउन मुळे काही गोष्टी कमी पडत असल्याने हा छोटासा प्रयत्न यश ने केला आहे
विकासनगर पेंडस काॅलनी येथील ओम पॅराडाईस सोसायटीत यश चे आजोबा वाॅचमनच काम करतात त्यामुळे सोसायटीत राहत असणारे, पुणे स्वारगेट पोलीस स्टेशन येथे कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांनी “यश” चे आजोबांसोबत सायंकाळी चर्चा करत असताना “यश”च्या आजोबांनी त्यांना गणेश मूर्तीची कल्पना दिली व यश बदलही सांगितले त्यामुळे वर्दीतील माणूसपण जपणारे पोलीस कॉन्सटेबल विजयसिंग पाटील यांनी त्वरित “यश” च्या घरी जाऊन भेट दिली व पर्यावरणपूरक अशा असणाऱ्या शाडू मातीच्या मूर्ती पाहून पहिली गणेश मूर्ती बुक केली.
पर्यावरणपूरक अशा ह्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत व त्या मूर्ती सर्वांनी या मुलाकडून खरेदी केल्यास त्याला उपचारासाठी व शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल व त्याच्या कलेला वाव मिळेल. त्यामुळे यंदा जरी कमी प्रमाणात मूर्ती उपलब्ध असल्यास आपण ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या खरेदी कराव्या व यशला आपण पुढच्या वर्षी जास्त प्रमाणात मूर्ती बनवता येईल व विकता येईल यासाठी आपण त्याला अर्थ सहाय्य करावे या वर्षी ज्यांना शक्य झाल्यास त्यांनी आणि पुढच्या वर्षी मात्र सर्वांनी यश कडून मूर्ती खरेदी करावी असे आव्हान पो.काॅ. विजयसिंग पाटील यांनी प्रजेच्या विकास साप्ताहिक व ऑनलाईन न्यूज चॅनल शी बोलताना केले.
ज्यांना मुर्ती हव्या आहेत त्यांनी यश चे वडील नितीन गरुड यांच्याशी आधिक माहिती करीता.मो.न. 7499320495 या वर संपर्क साधावा.
यशचे वडील नितीन गरुड:-
मला जसे समजले तसे मी यश ला मुर्ती बनवण्याचे सामान आणुन दिले व त्याचे कलेला वाव मिळावा आणि तो मोठा होईन त्याला लवकर यश संपादन होईल त्या कडुन सर्वानी मुर्ती घेतल्यास त्याच्या उपचारास व शिक्षणास मदत होईल