Home ताज्या बातम्या देहुरोड-अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कथा-कादंबऱ्या व 1000 हजार साहित्याचे तसेच 100...

देहुरोड-अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कथा-कादंबऱ्या व 1000 हजार साहित्याचे तसेच 100 किलो लाडू,100 झाडांची रोपे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते वाटप

91
0

देहुरोड,दि.1आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बहुजन विकास आघाडी देहूरोड शहर यांच्यावतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहा मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कामगार नेते लहू मामा शेलार यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी रामस्वरूप हरितवाल यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या लिखाण साहित्य कथा कादंबऱ्या समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली यावेळी संयोजक संजय धुतडमल यांनी मनोगत व्यक्त केले.

संयोजक संजय धुतडमल यांनी विचार व्यक्त केले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक हाजीमलंग मारुमुत्तू गोपाल तंतरपाळे कृष्णा दाभोळे यांच्यासह बोर्डाचे सर्व कर्मचारी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय धुतडमल यांनी सूत्रसंचालन केले, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय अधीक्षक राजन सावंत यांनी आभार व्यक्त केले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नियोजित उद्यान येथील येथे दुसऱ्या सत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त बहुजन विकास आघाडी या सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तु, गोपाळ तंतरपाळे, अतुल मराठे, कृष्णा दाभोळी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, मिकी कोचर, प्रवीण झेंडे, माजी प्रशासक सुनंदाताई आवळे, भाजपा भाजपाच्या महिला अध्यक्ष सारिका मुथा, रमेश जाधव, राजाराम अस्वरे विकी जाधव, सूर्यकांत सूर्वे, सुनील गायकवाड, इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांनी लिखाण केलेल्या कथा-कादंबऱ्या व त्यांच्या 1000 हजार साहित्याचे, शंभर किलो लाडू 100 वृक्षांची रोप वाटप आमदारांच्या हस्ते करण्यात आले
आमदारांनी आपल्या मनोगतामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आपण कोरोना या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरी करत आहोत संयोजकांना धन्यवाद देतो असे म्हणून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाची त्यांनी केलेल्या लिखाणाची समाजाला दिलेल्या आदर्शाची माहिती दिली व व त्यांच्या नावाने होणाऱ्या नियोजित उद्यानास कितीही खर्च लागला तरी मी तो करण्यास तयार आहे अशा महापुरुषांच्या नावाने हे उद्यान पूर्ण झाले पाहिजे या उद्यानात ग्रंथालय निर्माण झाले पाहिजे यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व ती मदत करेल असे आश्वासन दिले. यावेळी गोपाळ तंतरपाळे, कृष्णा दाभोळे, सुनंदाताई आवळे, सारिका मुथा, प्रवीण झेंडे संजय धुतडमल यांनी मनोगत व्यक्त केले


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष संजय धुतडमल यांनी केले, संतोष खुडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी शफी शेख, विजय नवगिरे, बन्सी गायकवाड, नितीन गजभिव, गौरव जेगरे, कैलाश वारके, संजय साठे, शेषनारायण पवार, राजू नवगिरे,शिवा कोळी, इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleशिक्षण विभागाची कारवाई योग्य,पालकांनी काही अडचणी असल्यास शाळेतील पदाधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधावा-मुख्यध्यापक अशिष गायकवाड
Next articleकार्य समाजासाठी प्रेरणादायी – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 9 =