वाकड,दि.31 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-गूड सॅमीरीटन स्कूल, वाकड,पुणे येथील शाळेवर बेकायदेशीर वह्या पुस्तकांची विक्री होत असल्याने त्याची काही पालकांकडून तक्रार आरटीआय कार्यकर्ते यांच्याकडे नाव न सांगण्याच्या अटी वर केली होती त्यानुसार त्यांनी पालिका प्रशासनाला त्याची तक्रार केली व शाळेवर महापालिका शिक्षण विभागाने कारवाई केली. पालिका प्रशासनाचे अधिकारी यांनी दोन वर्ग खोल्या सील केल्या त्यावर शाळेच्या पदाधिकारी यांनी पालक आणि शाळा याची एकमेकांचे समन्वय साधुन आज पत्रकार परिषद घेऊन काही खुलासा केला शाळेकडून जर चूक झाल्यास प्रशासनाला वाटत असेल तर आम्ही त्या गोष्टीला सामोरे जायला तयार आहोत पण वह्या पुस्तके विद्यार्थ्यांना एकत्र सर्व मिळावे या उद्देशाने आम्ही पालकांच्या विनंतीस मान देऊन वेंडर नुसार वह्या पुस्तक विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचत होतो पण काही पालक नाराज असल्याने त्यांनी शाळेच्या लोकांशी न बोलता परस्पर आरटीआय कार्यकर्त्यां पर्यंत पोहोचवली व कारवाई झाली त्यामुळे काही गोष्टींचा गैरसमज आरटीआय कार्यकर्ते आणि शाळा प्रशासनामध्ये झालेला आहे त्यामुळे पालकांनी असं न करता काही अडचणी असल्यास शाळेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावे आम्ही अडचण असल्यास ती दूर करू आणि इथून पुढे अशा प्रकारे शाळेतील कोणतेही शासनाचा अवमान होणार नाही याची काळजी शाळा प्रशासन घेईल त्यामुळे पालकांनी ह्या गोष्टी समजून घ्यावा काही पालक वह्या पुस्तके मिळवण्यासाठी आमच्याकडे अर्ज करत होते तर काही पालक त्याच्याविरोधात आहेत त्यामुळे हे गैरसमज होत आहेत तरी शासनाचा आदेश येईपर्यंत आम्ही कोणत्याही शाळेच्या गोष्टी बेकायदेशीर करणार नाही.आॅनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळेचा अभ्यासक्रम चालू आहे त्यामुळे आमचा कोणासही विरोध नाही कोणावर रोष नाही, शाळेची गुणवत्ता गेल्या तीस वर्षापासून चांगले असून खूप जुनी शाळा आहे सदर प्रकार हा पहिल्यांदाच होत असून त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो व यापुढे असा कोणताही गैरप्रकार होणार नाही आणि शासनाचे पायमल्ली होणार नाही असे वक्तव्य शाळेचे मुख्याध्यापक अशिष गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना केले सदर पत्रकार परिषदेत शोभा चव्हाण EPTA मेंबर, नितिका गायकवाड हेडमास्टर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी नगरसेवक अॅड. सचिन भोसले व शैलेश देशमुख सचिव व युसुब सर व शाळेच्या शिक्षक शिक्षिका पालक वर्ग आदी पदाधिकारी उपस्थित होते
Home ताज्या बातम्या शिक्षण विभागाची कारवाई योग्य,पालकांनी काही अडचणी असल्यास शाळेतील पदाधिकारी किंवा माझ्याशी संपर्क...