Home ताज्या बातम्या तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

42
0

नागपूर, दि.7जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी महिलेने मॅटर्निटी बेनिफिट नाकारल्याबद्दल आणि मानसिक छळ तसेच अपमानास्पद वागणुकीची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. या वागण्यावर आक्षेप घेत तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. सात दिवसात योग्य तो अहवाल सादर करावा असंही म्हटलं आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाचाही कार्यभार आहे. स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अपमानजनक वागणुकीची तक्रार दहा दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. आयुक्त तुकाराम मुंढे हे नेहमी इतर अधिकाऱ्यांपुढे अपमान करतात, प्रत्येक स्त्री कर्मचाऱ्याचा अधिकार असलेली प्रसूती रजा व लाभही मला नाकारण्यात आला असं त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. ज्यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाने तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहे व उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

Previous articleलायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल
Next articleशरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 − four =